जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vinayak chaturthi: श्रावण सुरू होताच विनायक चतुर्थी व्रत! या शुभ मुहूर्तांवर करा श्रीगणेशाची पूजा

Vinayak chaturthi: श्रावण सुरू होताच विनायक चतुर्थी व्रत! या शुभ मुहूर्तांवर करा श्रीगणेशाची पूजा

विनायक चतुर्थी पूजा कशी करावी

विनायक चतुर्थी पूजा कशी करावी

Shravan vinayak chaturthi: पहिली विनायक चतुर्थी अधिक महिन्याची असेल आणि दुसरी श्रावण महिन्याची असेल. विनायक चतुर्थीला रवियोग तयार होत असला तरी त्या दिवशी भद्रकाळही आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची विधीवत पूजा केली जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जुलै : अधिक श्रावण मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला श्रावणातील पहिली विनायक चतुर्थी आहे. यंदा श्रावण दोन महिन्यांचा असल्यानं दोन वेळा विनायक चतुर्थी व्रत केले जाणार आहे. पहिली विनायक चतुर्थी अधिक महिन्याची असेल आणि दुसरी श्रावण महिन्याची असेल. विनायक चतुर्थीला रवियोग तयार होत असला तरी त्या दिवशी भद्रकाळही आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची विधीवत पूजा केली जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी श्रावणातील पहिल्या विनायक चतुर्थीची दिलेली माहिती? गणेश पूजेचा शुभ मुहूर्त? याविषयी जाणून घेऊ. श्रावणातील विनायक चतुर्थी 2023 - हिंदू दिनदर्शिकेनुसार, अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 21 जुलै रोजी सकाळी 06.58 पासून सुरू होईल आणि ही तिथी 22 जुलै रोजी सकाळी 09.26 पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या आधारे, शुक्रवार, 21 जुलै रोजी श्रावणातील पहिली विनायक चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी उपवास ठेवून श्री गणेशाची पूजा करावी.

News18लोकमत
News18लोकमत

श्रावण विनायक चतुर्थी 2023 पूजा मुहूर्त - 21 जुलै रोजी विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दोन तास 45 मिनिटे आहे. या दिवशी गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 11.05 ते दुपारी 01.50 पर्यंत आहे. या शुभ काळात लाभ-उन्नति मुहूर्त आणि अमृत-सर्वोत्तम मुहूर्तही आहेत. चतुर्थीच्या दिवशी लाभ-उन्नति मुहूर्त सकाळी 10.44 ते दुपारी 12.27 पर्यंत आहे. तर अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:27 ते दुपारी 02:10 पर्यंत आहे. रॉयल लाइफ जगण्याचे शौकीन असतात या राशीची माणसं; स्वप्न सत्यातही उतरवतात रवियोगातील श्रावण विनायक चतुर्थी - श्रावणातील पहिली विनायक चतुर्थी रवियोगात आहे. 21 जुलै रोजी दुपारी 01.58 वाजेपासून रवि योग सुरू होत असून हा योग रविवार, 22 जुलै रोजी पहाटे 05.37 पर्यंत राहील. रवि योग हा शुभ योग आहे. यामध्ये तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग विनायक चतुर्थीला भद्रकाळ - विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रकाळही आहे. पण ही भद्रा पूजेच्या कालांतराने होत आहे. चतुर्थीच्या दिवशी, भद्रकाळ रात्री 08:12 पासून सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 22 जुलै रोजी सकाळी 05:37 पर्यंत आहे. या भद्राचा वास पृथ्वीवर आहे. भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करू नये. विनायक चतुर्थी 2023 चंद्रोदय - 21 जुलै रोजी चंद्रोदय सकाळी 08.29 वाजता होईल आणि चंद्रास्त रात्री 09.45 वाजता होईल. विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही. विनायक चतुर्थी व्रताचे महत्त्व - ही शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. या व्रतामध्ये गणेशाची पूजा विधिवत केली जाते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व कामे शुभ आणि सफल होतात. कामातील अडथळे दूर होतील. गणपतीच्या कृपेनं माणसाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात