मुंबई, 15 जून : धार्मिक श्रद्धेनुसार शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. शनिदेवाला न्यायाधीश म्हणून अत्यंत कडक मानले जातात. त्यामुळे त्यांना क्रोधी ग्रहही मानले जाते. त्यामुळे शनिदेवाचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. शनीचा त्रास मागे लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. कुंडलीत शनीच्या अशुभ प्रभावाने पीडित व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रासासोबतच अनेक आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला येथे शनि यंत्राच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत, ज्याची पूजा करून तुम्ही शनिदेवाचा आशीर्वाद मिळवून तुमचे जीवन सुखी आणि यशस्वी करू शकता. शनि यंत्र शुभ फळ देते - शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी ज्योतिषशास्त्रातही अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी एक सिद्ध आणि प्रभावी उपाय म्हणून शनि यंत्र मानले गेले आहे. बिहारच्या पटनाचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य ऋषी कुलश्रेष्ठ यांच्या मते, शनि यंत्राची नियमित पूजा करून घरामध्ये प्रतिष्ठापना केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. यामुळे व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू लागतात.
जाणून घ्या शनि यंत्र कसे बसवायचे? ज्योतिषी ऋषी कुलश्रेष्ठ सांगतात की, शनिवारी शनियंत्राची स्थापना करावी. सकाळी लवकर उठून नियमानुसार पूजा करून, स्नान करून पूजास्थळाची व्यवस्थित स्वच्छता करून तेथे शनियंत्राची स्थापना करता येते. यानंतर शनि यंत्रासमोर बसून “ओम शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा 11 वेळा जप करावा. यानंतर यंत्रावर गंगेचे पाणी शिंपडा आणि हात जोडून शनिदेवाला तुमच्यावर आशीर्वाद राहावा अशी प्रार्थना करा. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास ऋषी कुलश्रेष्ठ यांच्या मते, शनियंत्राची स्थापना केल्यानंतर त्याची नित्य पूजा करणे आवश्यक असते. अन्यथा शुभ फळ मिळू शकत नाही. ते पुढे म्हणतात की, जर तुम्हाला शनियंत्राची नियमित पूजा करता येत असेल तरच प्रतिष्ठापना करा, अन्यथा करू नका. याशिवाय जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा गळ्यात शनी यंत्र धारण करत असाल तर आंघोळ केल्यानंतर योग्य पूजन आणि मंत्रोच्चार केल्यानंतर हातात शनियंत्र घाला. शरीरावर धारण केलेले यंत्र कधीही पूजास्थळी लावू ठेवले जाणार नाही, याची विशेष काळजी घ्या. जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)