मुंबई, 17 जून : शनिवार हा मारुतीचा आणि कर्मफळ दाता शनिदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. शनिदेवाची उपासना करून उपवास केल्यानं साडेसातीच्या त्रासात आराम मिळतो. ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्या लोकांच्यावर शनिच्या साडेसाती-धैय्याचा प्रभाव दिसतो, त्यांनी शनिवारी शनि कवच पठण करावे. शक्य असल्यास पूजेच्या वेळी शनि महाराजांचे स्मरण करून दररोज शनि कवच पठण करावे. विशेषत: कोणत्या 5 राशीच्या लोकांनी शनि कवचचे पठण केले पाहिजे, याविषयी काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ. यावर्षी मकर, कुंभ, मीन, कर्क आणि वृश्चिक या पाच राशींवर शनी दोषाचा प्रभाव आहे. मकर, कुंभ आणि मीन राशींवर शनीची साडेसाती, महादशा सुरू आहे, तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर धैय्याचा प्रभाव आहे. हे पाहता या 5 राशीच्या लोकांनी शनिवारी व्रत ठेऊन शनिदेवाची पूजा करावी आणि त्यानंतर शनि कवच पठण जरूर करावे. शनि कवच पाठाचे फायदे - शनि कवच पठण केल्यानं मनुष्याला दुःख, रोग, संकटे इत्यादींपासून मुक्ती मिळते. शारीरिक आणि मानसिक दु:ख दूर होतात. शनिदेवाची कृपा प्राप्त होते. शनिदेवाच्या आशीर्वादाने माणूस सुरक्षित राहतो. येणारी संकटे टळतात. जो व्यक्ती नियमितपणे शनि कवच पठण करतो, तो साडेसाती आणि ध्यैयाच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहतो, असे मानले जाते.
शनि कवच अस्य श्री शनैश्चरकवचस्तोत्रमंत्रस्य कश्यप ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, शनैश्चरो देवता, शीं शक्तिः, शूं कीलकम्, शनैश्चरप्रीत्यर्थं जपे विनियोगः नीलाम्बरो नीलवपु: किरीटी गृध्रस्थितत्रासकरो धनुष्मान्। चतुर्भुज: सूर्यसुत: प्रसन्न: सदा मम स्याद्वरद: प्रशान्त:।। श्रृणुध्वमृषय: सर्वे शनिपीडाहरं महंत्। कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम्।। कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम्। शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम्।। ऊँ श्रीशनैश्चर: पातु भालं मे सूर्यनंदन:। नेत्रे छायात्मज: पातु कर्णो यमानुज:।। नासां वैवस्वत: पातु मुखं मे भास्कर: सदा। स्निग्धकण्ठश्च मे कण्ठ भुजौ पातु महाभुज:।। स्कन्धौ पातु शनिश्चैव करौ पातु शुभप्रद:। वक्ष: पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्थता।। सूर्याच्या कृपेनं काहीच कमी नाही पडणार; मिथुन संक्राती या राशींना भरभरून देईल नाभिं गृहपति: पातु मन्द: पातु कटिं तथा। ऊरू ममाSन्तक: पातु यमो जानुयुगं तथा।। पदौ मन्दगति: पातु सर्वांग पातु पिप्पल:। अंगोपांगानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनन्दन:।। इत्येतत् कवचं दिव्यं पठेत् सूर्यसुतस्य य:। न तस्य जायते पीडा प्रीतो भवन्ति सूर्यज:।। व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोSपि वा। कलत्रस्थो गतोवाSपि सुप्रीतस्तु सदा शनि:।। अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे। कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित्।। इत्येतत् कवचं दिव्यं सौरेर्यन्निर्मितं पुरा। जन्मलग्नस्थितान्दोषान् सर्वान्नाशयते प्रभु:।। Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)