मुंबई, 18 मे : शनी जयंती शुक्रवारी 19 मे रोजी साजरी होणार आहे. हा दिवस वैशाख महिन्यातील अमावस्येचा आहे. या तिथीला शनिदेवाचा जन्मदिवस आहे, म्हणून या तिथीला शनि अमावस्या असेही म्हणतात. शनि जयंतीच्यानिमित्तानं कर्मदाता शनिदेवाच्या प्रभावी मंत्रांचा जप केल्यास लाभ होईल. जे लोक शनीची महादशा म्हणजे साडेसाती किंवा धैय्यामध्ये आहेत, त्यांनी शनि जयंतीला शनि मंत्रांचा जप करून नक्कीच लाभ घेऊ शकतात. ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे ते खालील मंत्रांचा जप करू शकतात. याशिवाय शनि जयंतीला शनि कवच पाठ करू शकता. शनि कवच पठण केल्यानं शनिदेवाची कृपा होते आणि ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात. शनि कवच व्यतिरिक्त शनि स्तोत्राचे पठणदेखील लाभदायक आहे, त्यामुळे शनि महाराज प्रसन्न होतात. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांना शनिदेवाचे प्रभावी मंत्र आणि कवच याविषयी दिलेली माहिती पाहू. शनि महामंत्र ओम निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥ शनि बीज मंत्र ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
शनि रोग निवारण मंत्र ध्वजिनी धामिनी चैव कंकाली कलहप्रिहा। कंकटी कलही चाउथ तुरंगी महिषी अजा।। शनैर्नामानि पत्नीनामेतानि संजपन् पुमान्। दुःखानि नाश्येन्नित्यं सौभाग्यमेधते सुखमं।।राशि अनुसार शनि मंत्र मेष: ओम शांताय नम: वृषभ: ओम वरेण्णाय नम: मिथुन: ओम मंदाय नम: कर्क: ओम सुंदराय नम: सिंह: ओम सूर्यपुत्राय नम: कन्या: ओम महनीयगुणात्मने नम: तूळ: ओम छायापुत्राय नम: वृश्चिक: ओम नीलवर्णाय नम: धनु: ओम घनसारविलेपाय नम: मकर: ओम शर्वाय नम: कुंभ: ओम महेशाय नम: मीन: ओम सुंदराय नम: शनि कवच अस्य श्री शनैश्चरकवचस्तोत्रमंत्रस्य कश्यप ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, शनैश्चरो देवता, शीं शक्तिः, शूं कीलकम्, शनैश्चरप्रीत्यर्थं जपे विनियोगः नीलाम्बरो नीलवपु: किरीटी गृध्रस्थितत्रासकरो धनुष्मान्। चतुर्भुज: सूर्यसुत: प्रसन्न: सदा मम स्याद्वरद: प्रशान्त:।। श्रृणुध्वमृषय: सर्वे शनिपीडाहरं महंत्। कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम्।। कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम्। शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम्।। घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या ऊँ श्रीशनैश्चर: पातु भालं मे सूर्यनंदन:। नेत्रे छायात्मज: पातु कर्णो यमानुज:।। नासां वैवस्वत: पातु मुखं मे भास्कर: सदा। स्निग्धकण्ठश्च मे कण्ठ भुजौ पातु महाभुज:।। स्कन्धौ पातु शनिश्चैव करौ पातु शुभप्रद:। वक्ष: पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्थता।। नाभिं गृहपति: पातु मन्द: पातु कटिं तथा। ऊरू ममाSन्तक: पातु यमो जानुयुगं तथा।। पदौ मन्दगति: पातु सर्वांग पातु पिप्पल:। अंगोपांगानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनन्दन:।। इत्येतत् कवचं दिव्यं पठेत् सूर्यसुतस्य य:। न तस्य जायते पीडा प्रीतो भवन्ति सूर्यज:।। व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोSपि वा। कलत्रस्थो गतोवाSपि सुप्रीतस्तु सदा शनि:।। अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे। कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित्।। इत्येतत् कवचं दिव्यं सौरेर्यन्निर्मितं पुरा। जन्मलग्नस्थितान्दोषान् सर्वान्नाशयते प्रभु:।। अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)