मुंबई, 04 मे : येत्या 19 मे रोजी शनी जयंती साजरी होणार आहे. साडेसाती, अडीचकी आणि इतर शनि दोषांचा सामना करणाऱ्यांना त्यांचा प्रभाव कमी करण्याची ही चांगली संधी आहे. प्रसिद्ध ज्योतिषी पं. नंदकिशोर मुदगल यांनी सांगितले की, सध्या कर्क आणि वृश्चिक राशीवर शनिच्या धैय्याचा प्रभाव आहे आणि मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. यामुळे व्यक्तीचे मन अस्वस्थ होते, तार्किक क्षमता प्रभावित होते, दडपली जाते. योग्य विचार करण्यास आणि समजून घेण्यात अडचणी येतात. एकंदरीत साडेसाती हा जीवनातील खराब, त्रासदायक काळ असतो, असे मानले जाते. पंडित मुदगल यांनी सांगितले की, साडेसाती आणि शनि धैय्याचा प्रभाव कमी करण्यासाठी एक चांगला योगायोग घडत आहे. या पाच राशीच्या लोकांना शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करून लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया साडेसाती आणि धैय्याचा राशींवर होणारा परिणाम आणि उपाय. कर्क : या राशीच्या लोकांवर शनि धैय्याचा प्रभाव आहे. यामुळे मन चंचल राहते. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी राहते. त्यामुळे हे लोक तार्किकपणे बोलू शकत नाही उपाय : शनि जयंतीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
वृश्चिक : या राशीच्या लोकांना शनिच्या ढैय्याने आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. त्याचा परिणाम भावा-बहिणीच्या नात्यावर होत आहे. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी गडबडीत, झटपट निर्णय घेणे टाळावे. उपाय : शनि जयंतीच्या दिवशी शनि मंदिरात शनिदेवाची पूजा करावी. मकर : या राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे आरोग्य खराब राहू शकते. मन अस्वस्थ होऊ शकते. खर्च जास्त होईल. उपाय : शनिजयंतीला शनिदेवाची पूजा करावी आणि शनि स्तोत्राचे पठण करावे. बुद्ध पौर्णिमेला लागणारं चंद्रग्रहण विशेष योगात; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम कुंभ : या राशीच्या लोकांना साडे सातीच्या प्रभावामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यात खूप धावपळ आहे. वारंवार प्रवास करावा लागत आहे. उपाय : शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करून त्यांच्या बीज मंत्राचा जप करावा. मीन : या राशीच्या लोकांवरही साडेसातीचा प्रभाव आहे. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही बारकाईनं विचार करा. पत्नीशी वाद टाळा. उपाय : शनि जयंतीच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला शमीची पाने अर्पण करावीत. शनीच्या ग्रहस्थितीमुळं दुर्मिळ शश महापुरुष योग; या 5 राशीच्या लोकांसाठी वरदान पूजेचा शुभ काळ - पंडित मुदगल म्हणाले की, पंचांगानुसार यावर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या 18 मे रोजी रात्री 9.42 वाजता सुरू होत असून ही तिथी दुसऱ्या दिवशी 19 मे रोजी रात्री 9.22 वाजता समाप्त होईल. उदय तिथीच्या मान्यतेनुसार 19 मे रोजी वैशाख अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 7.11 ते 10.35 पर्यंत आहे. पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा - शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या मूर्तीच्या थेट समोर उभे राहू नका. विशेषतः त्यांच्या डोळ्यांकडे पाहू नका. त्यांची चरणस्पर्शाने पूजा करावी. त्यांच्या थेट डोळ्यात पाहिल्यानं कृदृष्टी मागे लागते, असे मानले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक संदर्भातील आणि संबंधित ज्योतिषी यांनी दिलेली आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)