1. मेष हे चंद्रग्रहण मेष राशीच्या सातव्या घरात होणार आहे. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. मानसिक त्रास होऊ शकतो. धनहानी टाळा. आकस्मिक अपघात टाळा. वैवाहिक जीवन सांभाळा.
2. वृषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाच्या काळात आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होतील. वाद आणि खटल्यातून सुटका होईल. यावेळी घाईघाईने निर्णय घेऊ नका.
3. मिथुन मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण पाचव्या भावात येणार आहे. याकाळात तुम्ही जागृक रहा, तब्येतीची काळजी घ्यावी. मुलाच्या बाजूने समस्या असू शकते. प्रवासात विशेष काळजी घ्या.
4. कर्क कर्क ही चंद्राची स्वत:ची राशी आहे. हे ग्रहण कर्क राशीच्या चौथ्या घरात होणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शिक्षण आणि करिअरमध्ये खूप मेहनत करावी लागेल. स्थान बदलण्याचा विचार करा. आई आणि घरातील स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घ्या.
5. सिंह सिंह राशीच्या तिसऱ्या घरात हे चंद्रग्रहण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. चालू असलेले अडथळे दूर होतील. पैशाशी संबंधित समस्या सुधारतील. भाऊ-बहिणीशी संबंध जपा.
6. कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण संपत्तीच्या घरात असेल. कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण चांगले राहणार आहे. धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. परंतु, कर्ज देण्यास टाळा. तब्येत खराब होऊ शकते.
7. तूळ तूळ राशीच्या लोकांनी या चंद्रग्रहणात काळजी घ्यावी. तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती कमकुवत राहू शकते. आरोग्य समस्या आणि अपघातांपासून जपा. लेखी कामात काळजी घ्या. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत अपयश मिळू शकते.
8. वृश्चिक वृश्चिक राशीमध्ये चंद्र दुर्बल आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाच्या वेळी मन स्थिर ठेवावे लागेल. कौटुंबिक आणि डोळ्यांच्या समस्या होण्याची शक्यता आहे. धन आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक संबंध आणि नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात.
9. धनु हे ग्रहण धनु राशीच्या अकराव्या घरात आहे, परंतु हे चंद्रग्रहण तुम्हाला संपत्ती, समृद्धी आणि आनंद देईल. तुमची स्थिती मजबूत राहील. संपत्तीत वाढ होईल. पैसा आणि सन्मान वाढेल. अचानक लाभही मिळतील.
10. मकर मकर राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या काळात आपल्या कर्माबाबत काळजी घ्यावी लागेल. थांबलेली महत्त्वाची कामे होतील. या काळात मोठे निर्णय घेण्याची घाई करू नका.
11. कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण नवव्या भावात होणार आहे. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य आणि आरामाची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे टाळा.
12. मीन मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप धोकादायक ठरणार आहे. या काळात आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक त्रासही होऊ शकतो.