जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Shani Dev: शनिवारी या 5 मंत्राचा उच्चार लाभदायी ठरतो! शनिकृपेचा कामांवर दिसतो परिणाम

Shani Dev: शनिवारी या 5 मंत्राचा उच्चार लाभदायी ठरतो! शनिकृपेचा कामांवर दिसतो परिणाम

शनिवारचे शनी मंत्र

शनिवारचे शनी मंत्र

How to Please Shani Dev : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांचे व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव पडतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र आहेत, ज्याचा जप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 जुलै : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला क्रूर ग्रह मानले जाते. शनिदेव जर एखाद्या व्यक्तीवर कोपले तर त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शनिदेवाची कृपा असणाऱ्यांचे भाग्य जोमात राहतं. शनिदेवाला कर्माचे फळ देणारे मानले जाते, जो व्यक्ती ज्या प्रकारचे काम करतो, त्याला त्याचे चांगले-वाईट परिणाम भोगावे लागतात. शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी तुम्ही 5 मंत्रांचा जप करून शनिदेवाला प्रसन्न करू शकता. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया ते 5 मंत्र कोणते आहेत आणि त्यांचा जप करण्याची योग्य पद्धत.

शनि देव के मंत्र

1. शनि देव का महामंत्र

ओम निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥

News18लोकमत
News18लोकमत

2. शनि गायत्री मंत्र

ओम भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्

3. शनि देव का बीज मंत्र

ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।

4. शनि आरोग्य मंत्र

ध्वजिनी धामिनी चैव कंकाली कलहप्रिहा। कंकटी कलही चाउथ तुरंगी महिषी अजा।। शनैर्नामानि पत्नीनामेतानि संजपन् पुमान्। दुःखानि नाश्येन्नित्यं सौभाग्यमेधते सुखमं।। या जन्मतारखांच्या महिला असतात मेहनती! कुटुंबाची एकहाती करू शकतात प्रगती

5. शनि दोष निवारण मंत्र

ओम त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम। उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।। ओम शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंयोरभिश्रवन्तु नः। ओम शं शनैश्चराय नमः।। या पद्धतीने मंत्रांचा जप करा - -शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. -यानंतर स्वच्छ काळ्या रंगाचे कपडे घाला. जर तुमच्याकडे काळे कपडे नसतील तर राखाडी, जांभळा, निळा असे समान रंगाचे कपडे घाला. -आता जवळच्या कोणत्याही शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा आणि त्यांना निळ्या रंगाची फुले अर्पण करा. घरी परतल्यानंतर कुशासनावर बसून वरील मंत्रांचा जप करावा. यामुळे शनिदेव शांत होतात आणि जीवनात सुख-संपत्तीचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वरील पद्धत पाळता येत नसल्यास आपल्या नेहमीच्या पद्धतीने मंत्र उच्चार करू शकता. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात