मुंबई, 31 ऑगस्ट : गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस ‘ऋषिपंचमी’ या वर्षी 1 सप्टेंबरला ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवसांमध्ये सात ऋषींची पूजा केली जाते. विशेषत: महिला हे व्रत करतात. हिंदू धर्मात ऋषिपंचमीला विशेष महत्त्व आहे. सप्तऋषींच्या पूजेसाठी दुपारची वेळ शुभ असल्याचं मानलं गेलं आहे. 1 सप्टेंबरला भाद्रपद शुक्ल पक्षातली पंचमी तिथी आणि गुरुवारचा दिवस असा शुभ योग आहे. या दिवसाची ओळख म्हणजे या दिवशी केली जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण भाजी. याला ऋषीची भाजी असेही म्हणतात. या वैशिष्ट्य पूर्ण भाजीमध्ये बऱ्याच भाज्या एकत्र केल्या जातात. तर ऋषींची भाजी ही ऋषिपंचमीचे वैशिष्ठ्य आहे आणि ती खरंच जर शास्त्रशुद्ध प्रकारे बनवली गेली तर ती जगात भारी आहेच!
Rishi Panchami Vrat 2022: ऋषिपंचमीच्या दिवशी करा सात ऋषींची पूजा, समजून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धतया भाजीत कारलं, गवार, चवळी, भोपळा, शिराळं, सुरण, तवसी काकडी, ढोबळी मिरची, लाल माठ, नवधारी भेंडी, अंबाडीचे फळ, अळु, पडवळ, मोत्यासारख्या दाण्याचे मक्याचे कणीस इत्यादी उपलब्ध हंगामी भाज्या याचा वापर केला जातो! अशी ही पौष्टिक भाजी एवढी चविष्ट असते की तुम्ही तोंडाला आवर घालू शकत नाही. केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, ऋषीपंचमीची भाजी ही एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ऋषीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तेल, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 10 बारीक चिरलेली अळूची पाने, 1 कप बारीक चिरलेली अरबी, 1 कप रताळ्याचे काप, 5-6 भेंडीचे काप, 1 कप कच्च्या केळीचे तुकडे, 1 कप अळूचे देठ बारीक केलेले, 1 कप सुरणाचे काप, 1 कप भोपळ्याचे काप, 1 कप शिराळीचे काप, 1 कप बारीक चिरलेला लाल माठ, 1 कणीस, 1 कप भिजवलेले शेंगदाणे, 1 कप ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ.
Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला बनत आहेत दुर्लभ योग; खरेदी, शुभकार्यासाठी हे 10 दिवस उत्तमऋषीची भाजी बनवण्यासाठी कृती एका मोठ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची घाला. नंतर एक एक करुन सर्व भाज्या घाला. मीठ आणि किसलेले खोबरे घालून चांगले ढवळून घ्या. थोडे पाणी घालून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घ्या. 10 मिनिटांनंतर झाकण काढून चांगले मिसळा. पुन्हा 5 मिनिटे झाकून ठेवा आणि भाज्या चांगल्या शिजू द्या. ऋषीची भाजी तयार आहे. रुचकर मेजवानी या युट्युब चॅनेलवर तुम्ही या रेसिपीचा व्हिडीओदेखील पाहू शकता. त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत. https://www.youtube.com/watch?v=tAyebITpFVo&t=78s अशाप्रकारे ही ऋषिपंचमीला बखस बनवली जाणारी, अनेक गुणांनी समृद्ध असणारी आणि पौष्टिक भाजी तुम्हीही नक्की बनवून पहा. याची चव तुम्हाला निश्चितच आवडेल.