मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ratha Saptami 2023: आज रथसप्तमी, सूर्याचं बल-तेज कायम पाठीशी राहण्यासाठी अशी करा पूजा

Ratha Saptami 2023: आज रथसप्तमी, सूर्याचं बल-तेज कायम पाठीशी राहण्यासाठी अशी करा पूजा

रथसप्तमीची पूजा कशी करावी

रथसप्तमीची पूजा कशी करावी

Ratha Saptami 2023 : रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन, आरोग्य आणि संतान प्राप्त होते. रथ सप्तमीला तीर्थस्नान केल्यानं सात प्रकारच्या महापापांचा नाश होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 25 जानेवारी : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान सूर्याचा जन्म रथ सप्तमीला झाला होता. त्यांचे वडील महर्षी कश्यप आणि आई अदिती. रथ सप्तमीला सूर्य जयंती, अचला सप्तमी, विधान सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघ सप्तमी, माघ जयंती इत्यादी नावांनी ओळखले जाते. वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजेच्या दोन दिवसांनी रथ सप्तमी साजरी केली जाते. जो रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन, आरोग्य आणि संतान प्राप्त होते. रथ सप्तमीला तीर्थस्नान केल्यानं सात प्रकारच्या महापापांचा नाश होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

यंदाची रथ सप्तमी कधी आहे?

श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी रथ सप्तमी शनिवार, 28 जानेवारी रोजी आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 27 जानेवारी रोजी सकाळी 09:20 वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी 28 जानेवारी रोजी सकाळी 08:43 वाजता समाप्त होत आहे. 28 जानेवारी रोजी उदयतिथीला रथ सप्तमी आहे.

रथ सप्तमी 2023 स्नान पूजा मुहूर्त -

आज 28 जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या स्नान आणि पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 05.25 ते 07.12 पर्यंत आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 07:12 वाजता होईल.

रथ सप्तमी व्रत आणि पूजा पद्धत

28 जानेवारी रोजी सकाळी स्नान करून सूर्याची उपासना करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर सूर्याची विधिवत पूजा करावी. अर्घ्य दान करा. सूर्य चालीसा पाठ करा आणि आरती देखील करावी. शक्य असल्यास त्या दिवशी आंघोळीपूर्वी तेलाने भरलेल्या दिव्यात आक आणि बेराची 7 पाने ठेवून डोक्यावरून उतरवून नदीत वाहू द्यावी. पूर्व नमस्ते रुद्ररूपाय, रसानां पतये नम: वरुणाय नमस्तेस्तु या मंत्राचा जप वाहण्यापूर्वी करावा. या दिवशी एकवेळचं जेवण मीठ न घातलेले खावे.

रथ सप्तमीचे महत्त्व -

रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांसह रथावर स्वार होऊन प्रकट झाले. त्यांनी आपल्या प्रकाशाने ही सृष्टी प्रकाशित केली होती, त्यामुळे या दिवशी सूर्याची पूजा केली जाते आणि या तिथीला रथ सप्तमी म्हणतात. रथ सप्तमीच्या दिवशी माता उपवास करतात आणि सूर्याची पूजा करतात. उपवासामुळे सुख, समृद्धी, वय, आरोग्य, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी लोकांची धार्मिक श्रद्धा आहे.

हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion