जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंब्र्याची ट्रॅफिक गर्ल! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तरुणीचा पुढाकार, पाहा Video

मुंब्र्याची ट्रॅफिक गर्ल! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तरुणीचा पुढाकार, पाहा Video

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 'मर्जीया पठाण' या तरुणीनं घेतला पुढाकार 

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 'मर्जीया पठाण' या तरुणीनं घेतला पुढाकार 

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मर्जीया पठाण या तरुणीने पुढाकार घेतला आहे. आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर फिरवून ती वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 19 एप्रिल : सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरु आहे. यामुळे देशभरातले मोठ मोठे मार्केट, खाऊगल्ल्यामध्ये गर्दी पाहिला मिळत आहे. मुंबई मध्ये मोहम्मद अली रोडनंतर आता मुंब्र्याच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहे. परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मुंबईतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मर्जीया पठाण या तरुणीने पुढाकार घेतला आहे. आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर फिरवून ती वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहे. मुंब्रा हा परिसर मुस्लिम बहुभाग असलेला परिसर आहे. त्यामुळे रमजान महिन्यात स्थानिक तसेच शिळफाटा l, कल्याण फाटा, तळोजा आदी परिसरातील नागरी सौंदर्यप्रसाधने, नकली दागिने, चपला, कपडे, तसेच ईद निमीत्त लागणारा सुकामेवा, शेवया आधी वस्तूंच्या खरेदीसाठी मुंब्रा शहरातील अमृत नगर ते कौसा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यवसायिकांकडे गर्दी करत आहेत. यामुळे येथील एकमेव प्रमुख राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 04 रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    वाहतूक विनाअडथळा व्यवस्थित सुरू राहावी तसेच बायपास दुरुस्तीसाठी बंद केल्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या ही जास्त असून या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा रात्री स्टेशन ते कौसादरम्यान असलेले 03 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना एक ते दीड तासांचा कालावधी लागतो आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त होत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा तसेच वाहतूक विनाअडथळा व्यवस्थित सुरू राहावी यासाठी मर्जीया प्रयत्न करत आहे.

    Ramdan 2023 : रमजाननिमित्त पर्वणी! ‘इथं’ मिळतात जगभरातील 40 प्रकारचे खजूर, पाहा Video

    सुरक्षेची जबाबदारी आमची देखील  गेल्या तीन वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. रमजानमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माझ्यासोबत माझे काही सहकारी काम करत असतात. खरेदीसाठी आणि खाण्याच्या विविध पदार्थांसाठी मुंब्रा हे सध्या प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध भागातून लोक खरेदीसाठी येत  असतात. यामध्ये दररोज तीस ते पन्नास हजार महिला या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. तर या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनासोबतच स्थानिक नागरिक म्हणून आमची देखील असल्याचं मर्जीया पठाण सांगते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात