मराठी बातम्या /बातम्या /religion /रामनामाचा महिमा अगाध! रामनवमीला 108 वेळा राम लिहण्याने असे मिळेल पुण्य

रामनामाचा महिमा अगाध! रामनवमीला 108 वेळा राम लिहण्याने असे मिळेल पुण्य

श्रीरामाच्या नावाचे माहात्म्य

श्रीरामाच्या नावाचे माहात्म्य

हिंदू धर्मग्रंथांनुसार, जगात राम नावापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. रामाच्या प्रत्येक अक्षरात आनंद आहे. "र" उच्चारणाने आपली सर्व पापे बाहेर पडतात आणि "म" उच्चारणाने मनाचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च : हिंदू धर्मात भगवान श्रीरामाला मर्यादापुरुषोत्तम, असे म्हणतात. श्रीराम हा महाविष्णूचा सातवा अवतार मानला जातो. दरवर्षी श्रीरामाचा जन्मदिवस संपूर्ण भारतात रामनवमी म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 2023 मध्ये रामनवमीचा सण गुरुवार, 30 मार्च रोजी साजरा होत आहे. केवळ रामाच्या नामस्मरणाने भाविक-भक्तांच्या सर्व प्रकारच्या समस्या संपतात, अशी हिंदू धर्माची श्रद्धा आहे. रामाच्या नामस्मरणाने कधी-कधी अशी फळे मिळतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. राम नामाचा जप कधीही केल्यानं आणि राम लिहिल्यानं आपल्याला श्रीरामाची कृपा मिळू शकते, रामनवमीला राम नामाचा जप केल्यानं विशेष फळ मिळते, असे मानले जाते. रामनवमीला भक्तांनी किमान 108 वेळा राम लिहून त्याची पूजा करावी. दिल्लीचे ज्योतिषी आचार्य पंडित आलोक पंड्या या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

प्रत्येक अक्षराला अद्भुत वैभव -

हिंदू धर्मग्रंथांनुसार, जगात राम नावापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. रामाच्या प्रत्येक अक्षरात आनंद आहे. "र" उच्चारणाने आपली सर्व पापे बाहेर पडतात आणि "म" उच्चारणाने मनाचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे ते पाप पुन्हा मनात प्रवेश करू शकत नाही. असे म्हणतात की, या कलियुगात राम नामानेच सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात.

रामनामासाठी लाल शाईचा वापर -

आनंद रामायणात सांगितले आहे की, रामनाम जपण्यापेक्षा रामाचे नाव लिहिल्यानं 100 पट जास्त पुण्य मिळतं. असे मानले जाते की, लाल रंगाच्या शाईने श्रीरामाचे नाव लिहिल्यानं हनुमानही प्रसन्न होतो. यामुळे शनि, राहू आणि केतू या अशुभ ग्रहांचा प्रकोप कमी होतो. राम नाम लिहिल्याने मन एकाग्र होते आणि स्मरणशक्ती वाढते, असे मानले जाते.

शास्त्रज्ञांचाही विश्वास -

राम या शब्दाच्या ध्वनीत जीवनातील सर्व दु:ख दूर करण्याची क्षमता आहे, असे ध्वनीविज्ञान मानते. ध्वनी शास्त्रज्ञांच्या मते, राम नामाचा उच्चार केल्याने मन शांत होते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. यासोबतच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ayodhya Ram Mandir, Religion