जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Pune News : हेच ते मंदिर जिथे चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाची घेतली होती शपथ Special report

Pune News : हेच ते मंदिर जिथे चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाची घेतली होती शपथ Special report

Pune News : हेच ते मंदिर जिथे चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाची घेतली होती शपथ Special report

पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा या मंदिराला लाभलेला आहे. चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाची शपथ इथं घेतली होती.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी  पुणे, 21 जून : राज्यात अनेक हेमाडपंथी मंदिर आहेत. त्यापैकीच एक गेल्या 100 वर्षांपूर्वीपासून असलेलं पुणे जिल्ह्यातल्या चिंचवड गावातील श्री क्षेत्र धनेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन शिवालय आहे. हे मंदिर दक्षिण वाहिनी पवना नदीच्या काठावर वसलेले आहे. हेमाडपंथी बांधणीच हे मंदिर असून पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा या मंदिराला लाभलेला आहे. संजीवन समाधीचा पावन सहवास महासाधू मोरया गोसावी यांनी याच मंदिरात ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली होती. त्यामुळे मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधीचा पावन सहवास चिंचवड मधील श्री क्षेत्र धनेश्वरला लाभला आहे. हिरवा गर्द परिसर, झुळझुळणारे पवनाजल, मंजुळ घंटानाद आणि गोशाळेतील गाईंच्या हंबरण्याचा आवाज यांनी या ठिकाणी प्रसन्न वाटते. मंदिरामध्ये गर्भ गाभारा आणि दर्शन गाभारा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तसेच पूर्वाभिमुख पाषाणाची पिंड आहे. मंदिरासमोर जुना पिंपळ वृक्ष आहे. त्यासमोर नंदी मंडप असून, त्यामधील नंदी रेखीव आहे. मंदिरामध्ये महाशिवरात्री श्रावणी सोमवार तसेच चंदन उटी गेल्या 40 वर्षांपासून गुरुचरित्र पारायण होत आहे. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अन्नदानाचा हजारो भाविक लाभ घेतात. मंदिरातील कोरीवकाम लक्षवेधक या मंदिरातील छतावरील नक्षीकाम तसेच फुलांचे कोरीवकाम सर्वांचे लक्ष वेधून घेते. महादेवांचे अतिशय सुंदर सालांकृत रूप या मंदिरात पाहायला मिळते. दक्षिण वाहिनी नदी आणि पूर्वाभिमुख शिवलिंग असे श्री त्र्यंबकेश्वर सारखेच महत्त्व या मंदिराला देखील आहे. मंदिराच्या सभा मंडपाचे काम चिंचवड ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्णत्वास आले आहे. पंढरीत आषाढी वारीची तयारी पूर्ण, पाहा कसं आहे नियोजन? Video मंदिराचे काम श्री धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्ट पहात आहे. महासाधू मोरया गोसावींच्या संजीवन समाधीचा पावन सहवास चिंचवडमधील श्री क्षेत्र धनेश्वरला लाभला आहे. धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्ट वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. तसेच क्रांतिवीर चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाची शपथसुद्धा याच मंदिरात घेतली होती, अशी माहितीमंदिराचे ट्रस्टी ऋषिकेश पवार यांनी दिली . मंदिरात होते ग्रहशांती पूजा महादेवांचे अतिशय सुंदर सालंकृत रूप या ठिकाणी पाहायला मिळते. भक्तीगीतांचे कार्यक्रम होतात. येथील गोशाळेत वीस गाईंची उत्तम देखभाल केली जाते. दक्षिण वाहिनी नदी आणि पूर्वाभिमुख शिवलिंग असे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर सारखेच स्थान महात्म्य आहे. त्यामुळे इथे ग्रहशांती पूजा करतात. पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा या मंदिराला लाभला आहे. 100 वर्षांपूर्वीचा पुरातन पिंपळवृक्ष 100 वर्षांपूर्वीचा पुरातन पिंपळवृक्ष या मंदिरावर छत्रछाया धरताना दिसतो. या वृक्षाच्या बुंध्याभोवती गुलाबी मोहक रंगाच्या पूर्ण विकसित कमळाची उभारणी केली आहे. सभोवती विघ्नेश्वर, दक्षिणमुखी मारुती मंदिर आणि मुंजोबा यांची मंदिरे आहेत. नक्षीदार स्तंभांवर तोललेला भव्य सभामंडप आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात