जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ashadhi Wari 2023: पंढरीत आषाढी वारीची तयारी पूर्ण, पाहा कसं आहे नियोजन? Video

Ashadhi Wari 2023: पंढरीत आषाढी वारीची तयारी पूर्ण, पाहा कसं आहे नियोजन? Video

Ashadhi Wari 2023: पंढरीत आषाढी वारीची तयारी पूर्ण, पाहा कसं आहे नियोजन? Video

Ashadhi Wari 2023: पंढरीत आषाढी वारीची तयारी पूर्ण, पाहा कसं आहे नियोजन? Video

यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरी नगरी सज्ज झाली आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 20 जून: आषाढी एकादशी जवळ आली असून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. 23 जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे धर्मपुरी येथे आगमन होणार आहे. तर तुकोबारायांच्या पालखीचे अकलूज माळशिरस येथे आगमन होणार आहे. त्यामुळे आषाढी वारीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. प्रत्यक्षात पंढरपुरातील प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून याबाबत सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी माहिती दिली. वारकऱ्यांसाठी कोणत्या सोयी? आषाढी वारीसाठी सर्व पालखीच्या मुक्कामाच्या स्थळी योग्य ती सोय करण्यात आली आहे. पंधरा हजार स्क्वेअर फूटचे मंडप प्रत्येक ठिकाणी टाकण्यात आले आहेत. शौचालयाची तसेच पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी आंघोळ आणि कपडे बदलण्याची उत्तम सोय यावेळी करण्यात आली आहे. तसेच दर दोन किलोमीटर परिसरात जिल्हा परिषदेच्या वतीने मंडप मारले असून तेथे वारकऱ्यांना दोन घटका बसता येईल. शिवाय प्रथमोपचाराची सुद्धा सोय तेथे करण्यात आली आहे, असे ठोंबरे यांनी सांगतिले.

News18लोकमत
News18लोकमत

पालखीसाटी 65 एकर परिसर सज्ज सध्या दिंड्यांचा तळ 65 एकर परिसरात असतो. त्यामुळे दिंडी आणि पालखी महामार्गावरील सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. 65 एकर आणि माऊलींचे सर्वात मोठे वाखरीचे रिंगण येथे सुद्धा व्यवस्थितपणे रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे. दर्शन रांगेसाठी पत्र्याचे शेड्स वाढवले असून कमी वेळात वारकऱ्यांना दर्शन घेता येणार आहे. तसेच 20 तारखेपासून 24 तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. चंद्रभागा नदीत पाणी सोडणार दरवर्षी पाण्याची सोय ही थोडीशी गोंधळलेले असताना यंदाच्या वर्षी 21 तारखेला उजनी धरणातून पाणी चंद्रभागेत सोडण्यात येणार आहे. चंद्रभागेच्या नदीपात्रातून जवळपास 100 टन कचरा काढण्यात आला आहे. तेथे कोणीही कचरा टाकू नये शिवाय त्यासाठी दोनशे रुपये इतका दंड जिल्हा प्रशासनाकडून आकारण्यात येणार आहे. उच्चशिक्षित वारकरी पंढरपूरला उलटं चालत का जात आहे? पाहा Video वारी झाल्यावर दोन दिवसांत शहर स्वच्छ पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना वारी होऊन गेल्यावर स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेऊन वारी झाल्यानंतर दोन दिवसात पूर्ण शहर सफाई करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. तसेच सर्व वारकऱ्यांनी आपले स्नान करून झाल्यावर तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा निर्माण टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा स्वच्छतेची वारी यंदाची वारी ही संपूर्णपणे स्वच्छतेची वारी करण्याकडे आमचा सर्वांचा कल आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या भरघोस निधीचा वापर आम्ही वारकऱ्यांच्या संपूर्ण सेवेसाठी करणार आहोत. फक्त पंढरपुरातील स्थानिकांना विनंती एवढीच आहे की वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. शिवाय प्रशासन सोबतीला असताना स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील असावे, असेही आवाहन पंढरपूर देवस्थानचे सीईओ तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात