मराठी बातम्या /बातम्या /religion /

500 दिंड्या, 3 लाख भाविक, पाहा कशी आहे संत निवृत्तीनाथांच्या यात्रेची तयारी

500 दिंड्या, 3 लाख भाविक, पाहा कशी आहे संत निवृत्तीनाथांच्या यात्रेची तयारी

त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 17 जानेवारी : त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. 18 जानेवारीला हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. पौषवारीनिमित्त होणाऱ्या या सोहळ्यासाठी वारकरी भाविकांच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. दोन वर्षानंतर हा भक्तिमय सोहळा पार पडत आहे. कारण गेली दोन वर्षे कोरोनाच थैमान देशभरात सुरू होते. त्यामुळे सर्वच सोहळ्यावंर बंधन आली होती. त्यामुळे वारकरी भक्तांचा हिरमोड झाला होता. यंदा मात्र सर्व निर्बंधमुक्त हा सोहळा पार पडणार आहे.

त्र्यंबकेश्वर प्रशासन आणि निवृत्तीनाथ मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी

संत निवृत्तीनाथांचा हा भक्तिमय सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सर्वच वारकरी भक्त आतुर झाले आहेत. वारकऱ्यांना त्र्यंबकेश्वरची ओढ लागली आहे. या वर्षी वारकरी भक्त मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास या वर्षी 500 हुन अधिक दिंड्या या सोहळ्यात सहभागी होतील. 3 लाख भाविक हा सोहळा अनुभवण्यासाठी येतील. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या वतीने सोहळ्याचे नियोजन सुरू आहे. याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे.

संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात कृत्रिम सभा मंडप, कृत्रिम दर्शन बारीचे उभारणी झालेली आहे. त्याचबरोबर यंदाची निर्मल वारी होण्यासाठी प्रशासनासह देवस्थान प्रशासन प्रयत्न करत आहेत. सध्या मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत मंदिर परिसरात कामे सुरू आहेत. यात्रा काळात राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होतात. त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

मंदिर परिसरातील मुख्य सभागृह सभामंडप पाडण्यात आले असल्याने या ठिकाणी कृत्रिम सभामंडप तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुख्य सभामंडप बाजूलाच कृत्रिम दर्शन बारीची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच वारकर्‍यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन बारी वरही मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्सव काळात देवस्थान परिसराला आकर्षक सजावट करण्यात येणार असून लाल गालीचा वापर करण्यात येणार आहे. संत निवृत्तीनाथ यात्रा निर्मल वारीसारखी व्हावी यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी दुभाजक मागून मंदिर परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. मानाच्या दिंड्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था करण्यात येणार असून श्रीफळ प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष निलेश तुकाराम गाढवे यांनी दिली.

सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यात दिवाळी साजरी, 2 वर्षांनी आला 'तो' योग! Video

पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर

यात्रा उत्सव काळात वाहनांची पार्किंग ही शहराच्या बाहेर करण्यात आली आहे. सरकारी बस या जव्हार फाटा परिसरात असलेल्या बस स्थानकामध्ये पार्क करण्यात आल्या आहेत. तिथूनच प्रवाशांची ने आन बस करतील तसेच इतर खाजगी वाहन शहरात जाणार नाही त्यांना ही बाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

First published:

Tags: Local18, Nashik