नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : ‘अर्ली टू बेड, अर्ली टू राइज’ ही कविता आपण सर्वांनी ऐकली असेल, पण बरेच लोक स्वत:च्या दिनक्रमानुसार झोपतात आणि सकाळी कधीही उठतात. व्यग्र जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या दिनचर्येवर परिणाम होतो. चांगली झोप माणसाचे मन फ्रेश ठेवते. निरोगी राहण्यासाठी फक्त पुरेशी झोपच नाही तर वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे देखील खूप महत्त्वाचे आहे. अनेकांना माहीत नसेल, पण झोपण्या-उठण्याच्या सवयीवरून त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही जाणून घेता येते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत. 8 ते 9 च्या दरम्यान झोपणे आणि 4 ते 6 च्या दरम्यान उठणे - बरेच लोक संध्याकाळी 8:00 ते 9:00 दरम्यान झोपतात आणि सकाळी 4:00 ते 7:00 दरम्यान उठणे पसंत करतात. जर तुम्ही देखील या झोपेचे चक्र पाळत असाल तर शक्य आहे की, तुमच्यात जन्मजात नेतृत्व गुण आहेत आणि तुमच्यात भरपूर आत्मविश्वास आहे. जे लोक या झोपेच्या चक्राचे पालन करतात ते महत्त्वाकांक्षी असतात आणि सार्वजनिक नायकाची भूमिका बजावतात. रात्री 1 ते 2 च्या दरम्यान झोपणे आणि सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान उठणे - बरेच लोक त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामुळे रात्री 1:00 ते 2:00 दरम्यान झोपतात आणि सकाळी 8:00 ते 10:00 च्या दरम्यान उठतात. जर तुम्ही देखील या झोपेचे चक्र पाळले तर तुम्ही संध्याकाळी आणि दुपारच्या वेळी अधिक उत्पादनक्षम होऊ शकता. अशा लोकांना फारसं मिसळायला आवडत नाही. याशिवाय असे लोक खूप क्रिएटिव्ह माइंडेड असू शकतात.
सूर्योदयाला जागे व्हा, सूर्यास्तानंतर झोपा - अनेकांना सूर्य उगवल्यावर लवकर उठणे आणि सूर्यास्तानंतर लवकर झोपणे आवडते. जर तुम्हीही या झोपेचे चक्र पाळले तर तुम्ही दिवसभर पॉझिटिव्ह उर्जेने परिपूर्ण राहाल. अशा लोकांना इतर लोकांशी मैत्री करायला आणि संवाद साधायला आवडते. हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)