मुंबई, 07 जुलै : काल गुरुवार, 06 जुलैपासून ‘निर्दोष’ पंचक लागलं आहे. हे जुलै महिन्यातील आणि श्रावण सुरू होण्यापूर्वीचे पंचक आहे. निर्दोष पंचक म्हणजे दोषरहित पंचक. हे पंचक 6 जुलै ते 10 जुलैपर्यंत आहे. पंचक सरू असताना दक्षिण दिशेला प्रवास करणे, स्लॅब वैगैरे छताची कामे इ. करू नये अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्या दिवसापासून पंचक सुरू होते, त्या दिवसापासून त्याचा परिणाम दिसून येतो. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांनी या पंचकाचा काय परिणाम होईल? पंचकचा आरंभ आणि शेवटचा काळ याविषयी दिलेली माहिती पाहुया. ‘दोषरहित’ पंचक म्हणजे काय? पंचांगानुसार बुधवार आणि गुरुवारी सुरू होणारे पंचक हे दोषरहित पंचक मानले जाते. कारण त्या पंचकामध्ये शुभ कार्य करण्यास हरकत नाही. अशा पंचकांचा अशुभ परिणाम होत नसतो. पंचक कसे असेल - पंचांगाच्या आधारावर पाहिले तर काल दुपारी 01:38 पासून पंचक सुरू झाले आहे आणि काल भद्रकाळ सुद्धा होता. पंचकातील तिसऱ्या आणि चतुर्थी दिवशी भद्रकाळ असेल. या दोन्ही भद्रा पृथ्वीच्या आहेत. भद्रामध्ये शुभ कार्य करण्यास मनाई असते. पंचक काळ कसा असेल - 6 जुलै, गुरुवार: पंचक सुरू, वेळ: 01:38 PM ते उद्या 05:29 AM, भद्रा: 05:29 AM ते 06:30 AM 7 जुलै, शुक्रवार: दिवसभर पंचक 8 जुलै, शनिवार: दिवसभर पंचक, भद्रा: रात्री 09:51 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 05:30 9 जुलै, रविवार: दिवसभर पंचक, भद्रा: सकाळी 05:30 ते सकाळी 08:50 10 जुलै, सोमवार: पंचक सकाळी 05:30 ते संध्याकाळी 06:59
पंचकशी संबंधित 5 महत्त्वाच्या गोष्टी 1. अशुभ नक्षत्रांच्या संयोगामुळे पंचक तयार होते. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो, धनिष्ठ नक्षत्र, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्रात भ्रमण करतो, तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात. 2. जर पंचक शनिवारी सुरू झाले तर त्याला मृत्यू पंचक म्हणतात, जर रविवारपासून पंचक सुरू झाले तर त्याला रोग पंचक म्हणतात. Budh Rashi Parivartan: 8 जुलैपासून या राशींचे अच्छे दिन, होईल धनवर्षा 3. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांला चोर पंचक म्हणतात, तर सोमवारी सुरू होणाऱ्या पंचकाला राज पंचक आणि मंगळवारी सुरू होणाऱ्या पंचकाला अग्नि पंचक म्हणतात. 4. पंचक काळात आग लागण्याची भीती, धनहानी, रोग, आर्थिक शिक्षा आणि कुटुंबात कलह होण्याची शक्यता असते. 5. धार्मिक मान्यतेनुसार पंचकमध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास योग्य पंडिताच्या सल्ल्याने गुरुड पुराणात सांगितलेल्या पद्धतीनुसार अंतिम संस्कार करावेत. यामुळे पंचकातील दोष दूर होतो. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)