मुंबई, 03 ऑक्टोबर: जीवनात सुख-समृद्धी यावी, यश, पैसा मिळावा आदी हेतुनं अनेकजण रोज आपल्या इष्ट देवतेची पूजा करतात. मनाच्या शांतीसाठीदेखील देवाचं नित्य स्मरण केलं जातं. खरं तर प्रत्येक देवतेची पूजा करण्याची पद्धत ही निरनिराळी असते. तुम्ही जर भगवान विष्णुचे भक्त असाल तर पूजाविधीत तुळशीला विशेष महत्त्व असतं. तसंच भगवान शंकराचे भक्त असाल तर पूजा विधीत बेल, जलाभिषेकाला विशेष महत्त्व असतं. धर्मशास्त्रात नमूद केल्यानुसार देवतांच्या आवडीच्या गोष्टी आपण अर्पण करत असतो. कोणत्याही देवतेची पूजा करताना काही नियम सांगितले गेले आहेत. पूजाविधी करताना या नियमांचं पालन प्रत्येकानं करणं आवश्यक असतं. सर्वसाधारणपणे पूजा विधी आटोपल्यावर आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो. देवाला नैवेद्य अर्पण करण्याचेदेखील काही नियम आहेत. पूजाविधी झाल्यावर नैवेद्याचं ताट लगेच उचलून बाजूला ठेवावं, असं जाणकार सांगतात. हे ताट तसंच देवघरात ठेवलं तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे नियमानुसार पूजाविधी करून देवाला नैवेद्य अर्पण करावा. जीवनात सुख, समृद्धी, पैसा, यश प्राप्त व्हावे, दुःख, अडचणी, अनारोग्यासारख्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून आपण देवाची पूजा, आराधना करतो. धर्मशास्त्रांत यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. देवाला नैवेद्य अर्पण करताना काही गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे. नैवेद्यासंबंधी नियमांकडे दु्र्लक्ष झालं तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो. देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यातील पदार्थांमध्ये मीठ किंवा मिरचीचा वापर केलेला नसावा. हेही वाचा - कापूर जाळताना या गोष्टी ध्यानात ठेवा; त्याच्यासोबत जळून जातील घरातील संकटे नैवेद्य दाखवताना ताटातील सर्व पदार्थांवर तुळशीपत्र ठेवावं. नैवेद्य दाखवून झाल्यावर नैवेद्याचं ताट पूजाविधी पूर्ण होताच लगेच बाजूला ठेवावं. देवासमोर हे ताट तसंच ठेवलं तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, असं जाणकार सांगतात. देवाला नैवेद्य सोनं, चांदी, पितळ्याच्या ताटात किंवा केळीच्या पानावर वाढावा. हे सर्व धातू नैसर्गिक असून, सनातन धर्मात त्यांना शुद्ध पवित्र मानलं गेलं आहे.
देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर ते ताट देवासमोरून लगेच उचलावं. त्यानंतर तो प्रसाद कुटुंबातील व्यक्ती आणि तुम्ही स्वतः खावा. काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर नैवेद्याचं ताट तसंच देवघरात ठेवतात. पण असं करणं अशुभ आहे. यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी धर्मशास्त्रांत सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.