जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / तुमची हरवलेली मौल्यवान वस्तू सापडू शकेल; अंकशास्त्राचं कॅलक्युलेशन सांगेल दिशा-ठिकाण

तुमची हरवलेली मौल्यवान वस्तू सापडू शकेल; अंकशास्त्राचं कॅलक्युलेशन सांगेल दिशा-ठिकाण

हरवलेली वस्तू सापडण्यासाठी उपाय

हरवलेली वस्तू सापडण्यासाठी उपाय

तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा मौल्यवान दागिने हरवले असतील तर अंकशास्त्राच्या मदतीनं तुम्ही त्यांचे स्थान शोधू शकता. जाणून घेऊया खास पद्धत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल : आपल्या हातून कधी ना कधी एखादी मौल्यवान वस्तू हरवली असेल. महत्त्वाची वस्तू हरवल्याचे दुःख ज्याच्या हातातून हरवलं जातं त्यालाच कळतं. बरीच शोधा-शोध करूनही काही हाताला लागत नाही, काही लोक यासाठी ज्योतिषांची मदत घेऊन ती गोष्ट परत मिळवण्यात यशस्वी होतात. ज्योतिषशास्त्रात, अंकशास्त्राच्या मदतीने हरवलेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध लावला जाऊ शकतो. जर तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा मौल्यवान दागिने हरवले असतील तर अंकशास्त्राच्या मदतीनं तुम्ही त्यांचे स्थान शोधू शकता. जाणून घेऊया खास पद्धत. ज्योतिषशास्त्र काय सांगते - ज्योतिष शास्त्रानुसार, जी वस्तू हरवली आहे, त्याचे नाव आधी लक्षात घ्या. त्या नावामध्ये किती अक्षरे आहेत पहा? सर्व अक्षरे मोजा. त्यांच्या येणाऱ्या संख्येत आणखी तीन अंक वाढवा. आता जी एकूण संख्या येईल त्या संख्येला पाचने भाग घालवा. भागल्यानंतर उरते काय? जर 1 बाकी राहत असेल तर याचा अर्थ असा की, तुमची हरवलेली वस्तू तुमच्या घरातच कुठेतरी आहे. बाकी 2 किंवा 3 असल्यास - पाच ने भागल्यावर 2 उरले तर ती वस्तू चोरीला गेल्याचे समजावे. जर 3 उरत असेल, तर ती वस्तू तुमच्या बेडरूममध्ये कुठेतरी आढळू शकते. जर 4 उरत असेल तर - जर बाकी 4 येत असेल, तर हरवलेली वस्तू तुमच्या घराजवळ पडली किंवा फेकली गेली आहे, हे सूचित होते. जर बाकी 0 आली, तर याचा अर्थ कोणीतरी तुमची मौल्यवान वस्तू मुद्दाम लपवून ठेवली आहेत आणि तुम्हाला ती लवकरच परत मिळेल.

News18लोकमत
News18लोकमत

शोधण्याची ही पद्धत देखील प्रभावी - याशिवाय हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी अंकशास्त्रात आणखी एक पद्धत सांगितली आहे. असे सांगितले जाते की, वस्तूच्या मालकाने आपल्या मनात 1 ते 108 पर्यंत कोणत्याही एका संख्येचा विचार करावा. आता या संख्येला नऊ ने भागा. जर बाती एक येत असेल तर हरवलेली वस्तू पूर्वेकडे असू शकते. जर बाकी दोन आली तर तुमची हरवलेली वस्तू स्त्रीकडे आहे, असे समजावे. जर बाकी तीन आली तर ती वस्तू आपल्याच लोकांकडे आहे आणि लवकरच मिळेल असे समजावे. हे वाचा -  शनी मागे लागलाच म्हणून समजा; जीवनात अशी कामं करणाऱ्यांना शनी सोडत नाही कधी जर बाकी चार आली तर समजून घ्या की, तुम्हाला तुमची वस्तू कधीच मिळणार नाही. जर पाच उरले तर समजून घ्या की, तुमची वस्तू परत मिळवण्यासाठी तुम्हाला काही काळ थांबावे लागेल. जर सहा बाकी आली तर ती वस्तू हरवलेली नसून तुम्ही स्वतः ती कुठेतरी ठेवलीय आणि ती जागा आपण विसरला आहात. हे वाचा -  तुळशीची 11 पाने बदलतील तुमचे नशीब, मनातील अपूर्ण इच्छा क्षणात होईल पूर्ण (सूचना : येथे दिलेली माहिती अंकशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात