मराठी बातम्या /बातम्या /religion /

Nashik : स्वामी महाराजांच्या संकल्पनेतून उभं राहिलं मंदिर, पाहा निर्मितीची प्रेरणा Video

Nashik : स्वामी महाराजांच्या संकल्पनेतून उभं राहिलं मंदिर, पाहा निर्मितीची प्रेरणा Video

नाशिकच्या पवित्र भूमी मध्ये भव्य,दिव्य स्वामी नारायण मंदिर उभ राहावं असा संकल्प विश्ववंदनीय प्रमुख स्वामी महाराजांनी केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक 1 ऑक्टोंबर : नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या या शहरामध्ये कुंभमेळा भरतो. नाशिकच्या जवळच त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग आहे. पंचवटी परिसरात प्रभू रामचंद्र यांनी पत्नी सिता आणि बंधू लक्ष्मणा सोबत वनवास काळात वास्तव्य केलेलं होत त्यामुळे ही पवित्र भूमी आहे.स्वामी नारायण यांनी देखील याच केवडीबन येथे काही काळ वास्तव्य केलं होतं.

नाशिकच्या पवित्र भूमी मध्ये भव्य,दिव्य स्वामी नारायण मंदिर उभ राहावं असा संकल्प विश्ववंदनीय प्रमुख स्वामी महाराजांनी केला होता. स्वामींचा हा संकल्प त्यांचे उत्तराधिकारी आणि बीपीएस अध्यक्ष महंत स्वामी यांनी पूर्ण केली आहे, अशी प्रतिक्रिया  स्वामी नारायण संस्थानचे प्रवक्ते आदर्शजीवन स्वामी यांनी दिली आहे.

प्रमुख स्वामी महाराजांच्या सेवा कार्याची दखल 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' ने देखील घेतली आहे. संपूर्ण जगभरात त्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी अकराशेहून अधिक धर्मस्थान,मंदिर निर्माण केली आहेत. त्यांचे  धार्मिक क्षेत्रात मोठ योगदान आहे, असंही आदर्शजीवन स्वामी यांनी स्पष्ट केले.

सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक, स्वामी नारायण मंदिर! पाहा Video

स्वामी नारायण मंदिरात राधा, श्रीकृष्ण, सिता माता, श्रीराम, लक्ष्मी नारायण देव, विठ्ठल रखूमाई, गणपती, हनुमान, महादेव यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. 'जे चांगलं आहे, त्याचे ग्रहण केले तर आपण चांगली निर्मिती करू शकतो, स्वत:ला चांगले बनवू शकतो असा संदेश स्वामी नारायण यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक धर्मातील देवांच्या अवतारांनी दिलेल्या संदेशाचे ग्रहण करण्याची शिकवण आपल्या अनुयायांना दिली होती.

गुगल मॅपवरून साभार

स्वामी नारायण मंदिराचा पत्ता

BAPS श्री स्वामी नारायण मंदिर, पंचवटी, नाशिक तपोवन केवडीबन, पिन कोड : 422003

First published:

Tags: Nashik, Temple, नाशिक