जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Nashik : सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक, स्वामी नारायण मंदिर! पाहा Video

Nashik : सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक, स्वामी नारायण मंदिर! पाहा Video

Nashik : सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक, स्वामी नारायण मंदिर! पाहा Video

सनातन धर्म आणि भारती संस्कृतीचे प्रतीक असलेल्या स्वामी नारायण मंदिरामुळे नाशिकच्या वैभवात भर पडली आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक 30 सप्टेंबर : नाशिकच्या गोदावरी किनारी साकारलेलं बिएपिएस स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. सर्वधर्म समभावच्या मुल्याची जपणूक करत हे भव्य मंदिर निर्माण करण्यात आले आहे. या मंदिरात सर्व  देवदेवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच धर्मातील बांधव  मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या वैभवात स्वामी नारायण मंदिरामुळे मोठी भर पडली आहे. या मंदिरातील मुख्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर देशभरातून स्वामी, महंत तसंच भाविकही आवर्जून उपस्थित होते. स्वामी नारायण मंदिरात  राधा, श्रीकृष्ण, सिता माता, श्रीराम, लक्ष्मी नारायण देव, विठ्ठल रखूमाई, गणपती, हनुमान, महादेव यांच्या  मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. ‘जे चांगलं आहे, त्याचे ग्रहण केले तर आपण चांगली निर्मिती करू शकतो, स्वत:ला चांगले बनवू शकतो असा संदेश स्वामी नारायण यांनी दिला आहे.  त्यामुळे त्यांनी प्रत्येक धर्मातील देवांच्या अवतारांनी दिलेल्या संदेशाचे ग्रहण करण्याची शिकवण आपल्या अनुयायांना दिली होती. ‘सनातन धर्म वाढला पाहिजे या उद्देशानं या मंदिरात विविध देव देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत,’ असे स्वामीनारायण संस्थानचे प्रवक्ते आदर्शजीवन स्वामी यांनी स्पष्ट केले. Photos: ‘स्वामी नारायण मंदिरामुळे नाशिकच्या वैभवात भर’, मुख्यमंत्र्यांची भावना नाशिक ही ऐतिहासिक भूमी आहे.या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात पत्नी सिता आणि बंधू लक्ष्मणा सोबत याच पंचवटी परिसरात वास्तव्य केलं होत,त्यामुळे ही पवित्र भूमी आहे.आणि याच पवित्र भूमी मध्ये स्वामी नारायण मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे आहे स्वामी नारायण मंदिर? बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिर, पंचवटी, नाशिक तपोवन केवडीबन (पिन कोड : 422003)नाशिक शहरातील मुख्य बसस्थानकापासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.सरकारी बस ने किंवा खाजगी वाहनाने आपण तिथपर्यंत पोहचू शकता,

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: nashik , temple
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात