अरुल्मिगु श्री राजकालियाम्मान मंदिर, मलेशिया : मलेशियातील हे शिव मंदिर 1922 मध्ये बांधले गेले होते, ज्याचे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते. काचेचे बनवलेले हे पहिले शिवमंदिर आहे आणि या मंदिराच्या भिंतीवर 3,00,000 रुद्राक्षांच्या माळा आहेत, ज्या खरोखर भव्य दिसतात. हे मंदिर जोहर बारूच्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. Photo Credit : Vertigo_Warrior (twitter)
शिव मंदिर, ऑकलंड, न्यूझीलंड (शिव मंदिर, ऑकलंड, न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे असलेले शिवमंदिर आचार्य महामंडलेश्वर स्वामी शिवेंद्र महाराज आणि यज्ञबाबा यांनी बांधले होते. येथे भगवान शिव नवडेश्वर शिवलिंगाच्या रूपात विराजमान आहेत. 2004 मध्ये पहिल्यांदा या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडण्यात आले होते. Photo Credit : aartigyan.com