मुंबई, 1 जुलै: जुलै महिन्याला आता सुरूवात झालीय. जुलै महिन्यात काही ग्रहांची उलथापालथ होत आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम होत असला तरी वैयक्तिक कुंडलीतील ग्रह काय सांगतात हे देखील महत्त्वाचे आहे. मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिना काय घेऊन येईल? ग्रहांच्या हालचाली काय सांगतात? हा महिना नफा देणार की तोटा? याबाबत मुंबईतील गुरुजी बिहारी खंडेराय श्रीखंडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कसा असेल महिना? मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यामध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण मेष राशीच्या पूर्वार्धात वाहनभय दर्शवत आहे. या व्यतिरिक्त मनासारख्या घटना घडण्याच्या शक्यता आहेत. महत्त्वाच्या गाठीभेटीतून भाग्यबीज पेरली जाणार असून कायद्याचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. घरपरीवार आणि मित्रपरिवार यांच्यासोबत सहली करमणुकीचा योग आहे. उत्तार्ध घराचा विजयोत्सवाचा पुत्र स्पर्श लाभण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर जुलैमध्ये महत्वाचा योग येणार आहे. अधिक मास दरम्यान शुभ योग दर्शवित आहे. सध्या पहिला गुरु सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील 3 वर्ष आर्थिक दृष्ट्या चांगली ठरणार आहेत. मोठे भाग्योदय ठरणार असून वैवाहिक जीवनात भाग्योदय असणार आहे. अमावस्या सामाजिक विरोधाशी राहिल. मंगळ गुरु चांगला दर्शविला जात आहे. बाकी राशींचा गुरु आणि पौर्णिमेजवळ पूर्ण शक्तीनीशी बोलेल. त्यामुळे अपघात भय दर्शविला जात आहे, असं बिहारी खंडेराय श्रीखंडे यांनी सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)