मुंबई, 24 नोव्हेंबर : मार्गशीर्ष महिना आजपासून (गुरूवार 24 नोव्हेंबर) सुरू होतोय. या महिन्यात त महालक्ष्मी देवीची पूजा, व्रत केले जाते. एका कलशात श्रीफळ ठेवून धान्याच्या राशीवर हा कलश ठेवला जातो. देवीसाठी बजारपेठेत वेगवेगळ्या साड्या सुद्धा मिळतात. मुंबईच्या दादर भागातील दुकानात देवीची विशिष्ट स्प्रेड साडी मिळते. कशी आहे ही साडी पाहूयात. महालक्ष्मीला नेसवली जाणारी कठापदराची एक विशिष्ट साडी आपण बघतो या साडीला स्प्रेड साडी म्हटलं जातं. वेगळ्या पद्धतीने शिवलेली ही साडी देवीच्या मूर्तीला नेसवली जाते. मार्गशीर्ष महिन्यात कलश स्थापनेनंतर साडी कलशाला नेसवली जाते. पूर्वी ही साडी नेसवताना दोऱ्या बांधायला अवघड व्हायचं त्यामुळे; आता कलशात अॅडजस्ट होईल असा स्टॅन्ड साडी घर येथे मिळतो. कलशाला हा स्टॅन्ड बांधला की त्यात अर्धगोल असलेली स्प्रेड साडी बांधणं सोपं होतं. कोणत्या साड्या उपलब्ध ? मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या पूजेसाठी विविध वस्त्र सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कॉटन, सिल्क, पैठणी,पॉलिकॉट, खण, ई. प्रकारच्या कापडी साड्या उपलब्ध आहेत. या साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे; कस्टमाईज पद्धतीने ग्राहक त्याच्या सोईनुसार साडी बनवून घेऊ शकतात. तसेच साडी आणि चुनरी जोडलेल्या साड्या इथे मिळतात. आपल्याकडे असलेल्या कलशाचे माप देऊन आपण येथे साड्या बनवून घेऊ शकतो. ग्राहकांना चुनरी वेगळी हवी असेल तर त्यासाठी साडीच्या मापानुसार चुनरी वेगळी मिळते. मराठमोळ्या रंगातील साड्या खूप आकर्षक दिसतात. मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व काय? पूजा-विधीपासून उपवासापर्यंत संपूर्ण माहिती कोणत्या मापाच्या साड्या मिळतात? साडीघर या दुकानात कलशाला लावण्यासाठी साडी स्टॅन्ड, तसंच 9 इंच ते पुढे हव्या त्या मापाच्या साड्या मिळतात. या साड्यांची किंमत 350 रुपयांपासून सुरु होते तर स्टॅन्डसुद्धा 350 रुपयांना मिळतं.
नोकरीच्या धावपळीत अनेकजण मार्गशीर्ष महिन्यात देवीचं व्रत, पूजा करतात. या पूजेसाठी पटकन तयार होता यावं आणि पूजेचं साहित्य लवकरात लवकर मांडता यावं यासाठी आम्ही साडी स्टॅन्ड आणि चुनरी जोडलेल्या साड्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. ग्राहकांचा या साड्यांना खुप प्रतिसाद मिळतोय.
Margashirsha Guruvar vrat katha : मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी वाचावी ही कथा
गुगल मॅपवरून साभार
दुकानाचा पत्ता - दुकान क्रमांक 6, साडीघर, रानडे रस्ता, नक्षत्र जवळ, दादर पश्चिम, मुंबई. संपर्क क्रमांक - 09821821877