मराठी बातम्या /बातम्या /religion /

Margashirsha Guruvar 2022 : मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व काय? पूजा-विधीपासून उपवासापर्यंत संपूर्ण माहिती

Margashirsha Guruvar 2022 : मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व काय? पूजा-विधीपासून उपवासापर्यंत संपूर्ण माहिती

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. मात्र या व्रताचे महत्व काय आहे आणि त्याची पूजा पद्धती काय आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. मात्र या व्रताचे महत्व काय आहे आणि त्याची पूजा पद्धती काय आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. मात्र या व्रताचे महत्व काय आहे आणि त्याची पूजा पद्धती काय आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 24 नोव्हेंबर : भारतीय संस्कृतीत देव आणि उपवासांना खूप महत्व आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरु होत आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. गुरुवारी सुवासिनी महिला मनोभावे हे व्रत करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते.

श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. मात्र या व्रताचे महत्व काय आहे आणि त्याची पूजा पद्धती काय आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारच्या तारखाही आपण पाहणार आहोत.

Margashirsha Guruvar vrat katha: मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी वाचावी ही कथा

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार

- 24 नोव्हेंबर 2022

- 01 डिसेंबर 2022

- 08 डिसेंबर 2022

- 15 डिसेंबर 2022

- 22 डिसेंबर 2022

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अशी करा पूजा

लेटेस्ट लीमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून तयार व्हावे. सुवासिनी या दिवशी उपवास करतात. सर्वप्रथम एल पाट मांडावा. त्या पाटावर स्वच्छ कापड अंथरावे. त्यानंतर एक पाण्याचा कलश घ्या. त्यात सुपारी, दूर्वा आणि नाणे टाकावे. कलशासाठी आंब्याची किंवा अशोकाची पाच ते सात पाने वापरावी. या पानांमध्ये नारळ ठेऊन कलश तयार करावा. त्यानंतर कलशावर हळद-कुंकु लावावे. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी.

आता पाटावर तांदळाची रस ठेवा आणि त्यावर तयार केलेला कलश ठेवा. कलशाची पूजा त्याला फुले आणि अक्षता अर्पण करा. कलशावर ठेवलेल्या नारळाला फुले आणि अक्षता अर्पण करा. यानंतर पाटावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. देवीच्या मूर्तीला हळद-कुंकू लावा आणि फुलांनी सजवा. नंतर देवीसमोर गोडाचा प्रसाद, मिठाई, खीर आणि फळे अर्पणकरा. दिवा लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करा आणि वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचा किंवा ऐका. जमल्यास महालक्ष्मी नमन अष्टक पठण करा आणि शेवटी आरती करा.

December Born People : कसे असतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक, पाहा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास पैलू

मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व

देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात.यादिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात. महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते, अशीही मान्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता केली जाते.

First published:

Tags: Lifestyle, Religion