अहमदाबाद, 18 फेब्रुवारी : आज महाशिवरात्री निमित्त देशातील शंकरांच्या मंदिरांत भाविकांच्या रांगा लागल्या. भक्तांनी महादेवाचं दर्शन घेतलं. अंबानी कुटुंबातील पितापुत्रही गुजरातमधील सोमनाथच्या दर्शनासाठी पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांनी सोमनाथचं दर्शन घेतलं. त्यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला कोट्यवधी रुपयांचं दानही केलं आहे. भगवान शिवाच्या सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये, सोमनाथ मंदिर हे अतिशय अद्वितीय आहे. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ मंदिरात जाऊन तिथं दर्शन घेतलं. भगवान शिवाला अभिषेक केला आणि प्रार्थना केली. मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष पी.के. लाहिरी आणि सचिव योगेंद्रभाई देसाई यांनी केलं. सोमनाथ महादेवाच्या दर्शनासोबतच मुकेश अंबानी यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1.51 कोटी रुपयांची देणगीही दिली.
Mukesh Ambani and his son Shri Akash Ambani visited Somnath on the occasion of #Mahashivratri, where they donated ₹1.51 crore to the Somnath temple trust.#MukeshAmbani #AkashAmbani #SomnathTemple pic.twitter.com/8LcbG6Tb56
— News18.com (@news18dotcom) February 18, 2023
असं मानलं जातं की, येथे शिवलिंगाची स्थापना भगवान चंद्राने केली होती, त्यामुळे याला सोमनाथ म्हटलं जातं. या मंदिराचे मूळ शिवलिंग हवेत तरंगतं. त्याच ठिकाणी दुसऱ्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. हे वाचा - इथे चक्क शिवभक्त राक्षसाची करतात पूजा, पाहा शंभू महादेव मंदिराची आगळी वेगळी आख्यायिका, Video मंदिराशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यात स्थित असलेला बाण स्तंभ. हा स्तंभ मंदिराच्या आवारातच बसवला असून त्यावर संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला आहे. अबाधित ज्योतिमार्ग म्हणजे स्तंभ आणि समुद्राच्या पलीकडे दक्षिण ध्रुव यांच्यामध्ये जमिनीचा एक तुकडाही नाही. या स्तंभापासून ते अंटार्क्टिकापर्यंत अधे-मधे जमिनीचा थोडाही भाग नाही, असा याचा सोप्या शब्दात अर्थ आहे. आजकाल तुम्ही मंदिरे पाडून मशीद बांधण्याच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. मुघल आणि त्यांच्या आधीच्या राज्यकर्त्यांनी अनेक मंदिरांवर हल्ले करून खूप नुकसान केल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. सोमनाथ मंदिर हे देखील यापैकी एक आहे, जे 17 वेळा लुटले गेलं (सोमनाथ मंदिरावर गझनीच्या महमूदाने 17 वेळा हल्ला केला). हे मंदिर 1000 ते 1024 दरम्यान ओटोमन तुर्कांपैकी निर्दयी आणि हापापलेल्या गझनीच्या महमूदाने 17 वेळा लुटलं होतं. मंदिरातून जमा केलेले सर्व पैसे तो सोबत घेऊन जायचा. हे वाचा - इथे चक्क शिवभक्त राक्षसाची करतात पूजा, पाहा शंभू महादेव मंदिराची आगळी वेगळी आख्यायिका, Video सोमनाथ मंदिराचा उल्लेख स्कंद पुराण, ऋग्वेद, भगवद्गीता, शिवपुराण इत्यादींमध्ये आढळतो. यावरून हे मंदिर किती जुनं आहे, हे स्पष्ट होतं.