शाश्वत सिंह, प्रतिनिधी झाशी, 5 जुलै : काशीच्या धर्तीवर झाशी हे सुद्धा शिवलयांसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक शिवमंदिरे आहेत. गोसाईंपासून ते मराठा शासकांपर्यंत अनेकांनी येथे शिवमंदिरे बांधली. हजारिया महादेव मंदिर हे याच एका मंदिरांपैकी एक आहे. झाशीतील पानी वाली धर्मशाळेजवळ असलेला हे शिवालय सुमारे 400 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात स्थापन केलेल्या मुख्य शिवलिंगावर 1008 छोटी शिवलिंगे बांधलेली आहेत. हजारीया महादेव मंदिरात बसवलेले शिवलिंग एकूण 3 फूट आकाराचे आहे. या शिवलिंगावर 10 चक्रे आहेत. प्रत्येक चक्रात 108 छोटी शिवलिंगे बनवली आहेत. अशा प्रकारे शिवलिंगावर एकूण 1008 शिवलिंग आहेत. येथील एका शिवलिंगाला जल अर्पण केल्याने 1008 शिवलिंगांना जल अर्पण करण्याचा लाभ मिळतो.
असे मानले जाते की, या शिव रुद्र कोटी संहितेचे पठण केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात आणि व्यक्ती निरोगी राहतो. या मंदिरात शिव परिवाराच्या जागी शिव पंचायत बसलेली आहे. येथे भगवान शंकराव्यतिरिक्त भगवान सूर्य, माता दुर्गा, भगवान विष्णू आणि भगवान गणेश विराजमान आहेत.
गोसाई राज्यकर्त्यांनी बांधले मंदिर - या मंदिरात येत असलेले भाविक अशोक पुरोहित यांनी सांगितले की, हजारिया महादेव मंदिरांचे निर्माण गोसाईं राज्यकर्त्यांनीी केले होते. या मंदिरात श्रावण महिन्यात रोज रुद्राभिषेक केला जातो. भाविक येथून कंवर उचलतात आणि बुंदेलखंडची गंगा म्हटल्या जाणार्या ओरछा येथील पाणी भरून येथे आणतात. त्यांनी सांगितले की, मंदिरात सकाळची आरती सकाळी 6.30 वाजता आणि सायंकाळी 8 वाजता आरती केली जाते. भाविकांना येथे श्रावणात विशेष पूजा देखील करता येते. यासाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही, असेही त्यांनी सांगितले.