अहमदनगर, 18 जानेवारी : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर कुळ धरण रस्त्यावर दुरगावं नावाच गाव आहे. या गावात अस एक मंदिर आहे ज्यांची महाभारतात खलनायकी भूमिका होती. गावात दुर्योधनाचे मंदिर असून महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. गावातील लोकांची या मंदिराप्रती श्रद्धा असून ते मनोभावे पूजा करतात.
मंदिर पंधराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराबद्दल अनेक लोककथा आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावं हे तिथे वास्तव्यात असणाऱ्या दैत्य, राक्षसामुळे ओळखले जातात. दुर्योधनाच्या मंदिरामुळेच गावचे नाव देखील दुरगाव पडले आहे. कौरव पांडवाचे युद्ध झाल्यानंतर घायाळ झालेला दुर्योधन पांडवांना शरणागती न जाता दंडक अभयारण्यात निघून गेला. दुर्योधन महादेवाचा मोठा भक्त होता. मंदिरात दोन पिंडी पाहायला मिळतात.
भुयारी मार्ग
मंदिरातून एक भुयारी मार्ग होता तो भुयारी मार्ग अश्वत्थामा यांच्या मंदिरात जातो. लोककथेनुसार दुर्योधन रात्रीच्या वेळी अश्वत्थामाला भेटण्यासाठी भुयारी मार्गाने जात असतं अशी आख्यायिका आहे.
कळसात वसलेली मूर्ती
मंदिराच्या दगडांवरती मोडी भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे. मंदिरात दुर्योधनाची जी मूर्ती आहे, ती या मंदिराच्या कळसात विराजमान झालेली आहे. म्हणजेच युद्ध संपल्यानंतर दुर्योधनाला वाचवण्यासाठी खुद्द शंकर महादेवांनी आपला जटांमध्ये त्यांना स्थान दिल्याचं सांगितले जाते.
काय आहे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचा इतिहास? पाहा Video
दुर्योधनाला पाहून ढग पळतात
दुरगावात जर पाऊस पडत नसेल तर दुर्योधनाची मूर्ती झाकली जात आहे. दुर्योधनाला पाहून ढग पळून जातात. म्हणून मूर्ती झाकली जाते. जेव्हा मूर्तीला घाम फुटतो तेव्हा या गावात पाऊस पडतो. पाऊस पडत नसले तर मंदिर बंद करण्याची परंपरा आजही जपली आहे.
धार्मिक उत्सवाचे आयोजन
दर तीन वर्षाला या मंदिरात मोठा उत्सव केला जातो. अधिक महिन्यात 8 दिवस इथे सप्ताहाचे आयोजन केले जाते. या मंदिराचा क दर्जाच्या पर्यटन स्थळात समावेश झाला आहे. मात्र मंदिर आणि परिसराचा विकास खुंटलेला आहे. अनेकांना तर हे दुर्योधनाचा मंदिर देखील ठाऊक नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.