जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / संपला एकदाचा खरमास! कधी कोणत्या महिन्यात आहेत लग्न, जावळ, गृहप्रवेशांना मुहूर्त पहा

संपला एकदाचा खरमास! कधी कोणत्या महिन्यात आहेत लग्न, जावळ, गृहप्रवेशांना मुहूर्त पहा

खरमासानंतरचे शुभ मुहूर्त

खरमासानंतरचे शुभ मुहूर्त

kharmas 2023 Subh vivah muhurat: खरमासाचे दिवस अशुभ काळ म्हणून गणले जातात, त्यामुळे लग्न, मुंडन, गृहप्रवेश यासारख्या गोष्टींना शुभमुहूर्त मिळत नाहीत. पण, आजपासून खरमास संपत असल्यानं शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 एप्रिल : आज शुक्रवारपासून खरमास संपत आहे. आज दुपारी 03.12 वाजता सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, त्यामुळे सोबतच खरमासही संपेल. जेव्हा सूर्य गुरूच्या धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास असतो. खरमासाचे दिवस अशुभ काळ म्हणून गणले जातात, त्यामुळे लग्न, मुंडन, गृहप्रवेश यासारख्या गोष्टींना शुभमुहूर्त मिळत नाहीत. पण, आजपासून खरमास संपत असल्यानं शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ होणार आहे. खरमास संपल्याने जावळ/मुंडन विधीला लगेच शुभ मुहूर्त आहे, पण लग्न आणि गृहप्रवेशांना मात्र शुभ मुहूर्त 27 एप्रिलनंतरच प्राप्त होणार आहेत. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, लग्न आणि गृहप्रवेशासाठी गुरु ग्रह उच्च स्थितीत असणे आवश्यक आहे. गुरु सध्या अस्त स्थितीत आहे आणि तो 27 एप्रिल रोजी उगवेल. खरमासानंतर लग्न, मुंडन आणि गृहप्रवेशासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया. खरमाची समाप्ती वेळ 2023 - 14 एप्रिल, शुक्रवार, दुपारी 03:12 गुरुउदय 2023 वेळ - 27 एप्रिल गुरुवार मेष राशीत पहाटे 02:07 वाजता खरमास 2023 नंतर गृहप्रवेश- आज खरमास संपल्यानंतर मे, जून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त आहेत. मे महिन्यात 7 दिवस, जूनमध्ये 1 दिवस, नोव्हेंबरमध्ये 6 दिवस आणि डिसेंबरमध्ये 4 दिवस गृहप्रवेशासाठी शुभ दिवस आहेत. मे 2023 गृहप्रवेश मुहूर्त: 6, 11, 15, 20, 22, 29 आणि 31. जून 2023 गृहप्रवेश मुहूर्त: 12. नोव्हेंबर 2023 गृहप्रवेश मुहूर्त: 17, 18, 22, 23, 27 आणि 29. डिसेंबर 2023 गृहप्रवेश मुहूर्त: 6, 8, 15 आणि 21. हे वाचा -  तुळशीची 11 पाने बदलतील तुमचे नशीब, मनातील अपूर्ण इच्छा क्षणात होईल पूर्ण खरमास 2023 नंतर मुंडन मुहूर्त एप्रिल, मे आणि जून हे खरमासानंतर मुंडन/जावळ करण्यासाठी शुभ काळ आहेत. एप्रिलमध्ये 3 दिवस, मेमध्ये 7 दिवस आणि जूनमध्ये 7 दिवस मुंडण/जावळ करण्यासाठी शुभ आहेत. एप्रिल मुंडन मुहूर्त 2023: 24, 26 आणि 27. मे मुंडन मुहूर्त 2023: 5, 8, 11, 17, 22, 24 आणि 31. जून मुंडन मुहूर्त 2023: 1, 8, 9, 19, 21, 28 आणि 29.

News18लोकमत
News18लोकमत

खरमास 2023 नंतर लग्नाचे मुहूर्त - लग्नासाठी शुभ मुहूर्त मे, जून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आहेत. मे महिन्यात 13 दिवस, जूनमध्ये 11 दिवस, नोव्हेंबरमध्ये 5 दिवस आणि डिसेंबरमध्ये 7 दिवस मुहूर्त मिळतील. मे 2023 विवाह मुहूर्त: ६, ८, ९, १०, ११, १५, १६, २०, २१, २२, २७, २९ आणि ३०. जून 2023 विवाह मुहूर्त: 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26 आणि 27. नोव्हेंबर 2023 विवाह मुहूर्त: 23, 24, 27, 28 आणि 29. डिसेंबर 2023 विवाह मुहूर्त: ५, ६, ७, ८, ९, ११ आणि १५. हे वाचा -   सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात