मुंबई, 8 नोव्हेंबर : आज मंगळवार 08 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मनाली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान, पूजा आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदी किंवा पवित्र नदीत स्नान केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. मात्र कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक स्वामींचा नेमका संबंध काय हे तुम्हाला माहित आहे का? कार्तिक स्वामी म्हणजेच महादेव आणि पार्वतीचे पुत्र कार्तिक आहेत. कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात आणि केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एका दिवस उघडले जातात. याचदिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल असे का? आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक कथा जाणून घ्यावी लागेल.
Kartik Purnima 2022: आज कार्तिक पौर्णिमेला महाविष्णूच्या नारायण स्तोत्राचे करा पठणहे आहे स्वामींचे मंदिर बंद असण्याचे कारण कार्तिकेय हे भगवान शंकराचे ज्येष्ठ पुत्र आहेत. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांचे दोन्ही पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना सांगितले की, जगाची परिक्रमा केल्यानंतर जो कोणी आमच्याकडे प्रथम येईल, त्याची पूजा प्रथम मानली जाईल. त्याला जगातील पहिल्या पूज्य देवतेचा दर्जा मिळेल. यानंतर कार्तिकेय आपल्या वाहन मोरावर स्वार होऊन तिन्ही लोकाची परिक्रमा करण्यासाठी निघाले.
पण शिव पार्वतीचे कनिष्ट पुत्र श्रीगणेशांनी आई-वडिलांची प्रदक्षिणा केली आणि माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली असे सांगितले. माता पार्वती यांनी विचारले, ते कसे? तर श्रीगणेशांनी आईला उत्तर दिले की, आई-वडिलांमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. गणेशाच्या बुद्धीमत्तेने प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी श्रीगणेशाला आशीर्वाद दिला की, सर्व देवतांच्या आधी त्यांची पूजा केली जाईल. तेव्हापासून गणपतीला आद्य पूज्य देवता मानले जाते. कार्तिकेयाचा शाप कार्तिकेयाने जेव्हा जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते परत आले, तेव्हा त्याने पहिले पूजनीय देवता म्हणून गणेशाची प्रशंसा सुरु होती. सर्वांनी त्यांना प्रथम पूज्य देव मानले होते. यामुळे कार्तिकेय माता पार्वतीवर रागावले आणि त्यांनी स्वतःला गुहेत कोंडून घेतले आणि कोणालाही दर्शन न देण्याची शपथ घेतली. त्यांनी शाप दिला की, त्यांचे दर्शन घेणारी स्त्री विधवा होईल आणि पुरुष 7 जन्म नरकात जातील. यावर भगवान शिव आणि माता पार्वतीने स्वामी कार्तिकेयांना समजावले.
Tripurari Purnima 2022 Wishes : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खास मेसेज; नातेवाईक, मित्रमैत्रिणींना द्या मंगलमय शुभेच्छाकार्तिकेयाचा राग शांत झाल्यावर त्यांनाही याचा पश्चाताप झाला. माता पार्वतीने त्यांना वर्षातून एक दिवस दर्शन देण्यास पटवून दिले. तेव्हा कार्तिकेयांनी सांगितले की, ‘आपल्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी भक्तांना दर्शन देईन.’ यानंतर महादेवाने कार्तिक स्वामींच्या जन्मदिनी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला कार्तिकीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे वरदान दिले. त्यामुळे धार्मिकी मान्यतेनुसार, त्यामुळे स्वामींचे मंदिर वर्षातून एक दिवस उघडले जाते.