मुंबई, 27 जुलै : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. अधिक मासात येणारी कमला एकादशी तीन वर्षांतून एकदा येत असल्याने ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अधिक मास तीन वर्षांनी येतो. अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक फळ प्राप्त होते. यावर्षी कमला म्हणजेच पद्मिनी एकादशी 29 जुलै 2023 रोजी शनिवारी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच तुम्ही या ज्योतिषीय उपायांचा अवलंब करू शकता. असे मानले जाते की, हे उपाय केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि शेवटी स्वर्गीय निवास प्राप्त होतो. जाणून घेऊया पद्मिनी एकादशीला कोणते शुभ उपाय करावे. कमला/ पद्मिनी एकादशीच्या दिवशी हे उपाय करा - शंखाने जलाभिषेक करावा - कमला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला शंखातून जल अर्पण करा. असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धीचे वरदान देतात, असे मानले जाते.
तुळशीची पूजा - पद्मिनी एकादशीच्या दिवशी तुळशीपूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा. यासह पाच किंवा 11 वेळा प्रदक्षिणा करावी. यामुळे विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. दान द्या - पद्मिनी एकादशीच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. म्हणूनच या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना कपडे, पैसे, धान्य इत्यादी दान करावे. गजेंद्र मोक्षाचे पठण - जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पद्मिनी एकादशीच्या दिवशी गजेंद्र मोक्षाचे पठण करावे. हा पाठ केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळेल. या जन्मतारखांच्या महिला असतात मेहनती! कुटुंबाची एकहाती करू शकतात प्रगती पिंपळ पूजन - शास्त्रानुसार असे मानले जाते की, पिंपळात भगवान विष्णू वास करतात. म्हणूनच पद्मिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्यासोबत दिवा लावा. असे केल्याने शनिदोषापासूनही शांती मिळू शकते. दक्षिणाभिमुख शंख ठेवा - शास्त्रानुसार दोन शंख घरात ठेवावेत. त्यापैकी एक फक्त पूजेसाठी आणि दुसरा नादासाठी असावा. पद्मिनी एकादशीच्या दिवशी देव्हाऱ्यात दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करू शकता. खिरीचा नैवैद्य - पद्मिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला नैवेद्यात खीर अर्पण करा. त्यामध्ये तुळशीची पाने जरूर टाका. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो, असे मानले जाते. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)