जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Kamika Ekadashi: आज कामिका एकादशी! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, उपासना पद्धती, विष्णूआराधना पापमुक्त करेल

Kamika Ekadashi: आज कामिका एकादशी! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, उपासना पद्धती, विष्णूआराधना पापमुक्त करेल

कामिका एकादशी 2023

कामिका एकादशी 2023

Kamika Ekadashi 2023: आज उपवास करून भगवान श्री हरी विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै : आज गुरुवारी कामिका एकादशी व्रत आहे. आज उपवास करून भगवान श्री हरी विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कामिका एकादशी व्रताच्या कथेत ब्रह्महत्यासारख्या पापांपासून मुक्तीचा मार्ग सांगितला आहे. जो मनुष्य कामिका एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूला तुळशी अर्पण करतो, विधिपूर्वक पूजा करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो, असे मानले जाते. तीर्थक्षेत्रात स्नान केल्यासारखे पुण्य त्याला मिळते. कामिका एकादशीचे व्रत आणि उपासना पद्धती, मुहूर्त, पारण वेळ इत्यादींविषयी काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ. कामिका एकादशी 2023 मुहूर्त - आषाढ कृष्ण एकादशीची सुरुवात: 12 जुलै, बुधवार, संध्याकाळी 05:59 पासून आषाढ कृष्ण एकादशी तिथी समाप्त: 13 जुलै, गुरुवार, संध्याकाळी 06:24 वाजता कामिका एकादशी पूजेच्या वेळा: आज सकाळी 05:32 AM ते 07:16 AM, 10:43 AM ते 03:45 PM आजचा अभिजित मुहूर्त: सकाळी 11.59 ते दुपारी 12.54 कामिका एकादशीचा उपवास सोडण्याचा वेळ: उद्या, 05:32 AM ते 08:18 AM द्वादशी तिथीची समाप्ती : उद्या सकाळी 07.17 वा.

News18लोकमत
News18लोकमत

कामिका एकादशी व्रत आणि पूजा पद्धती - 1. सकाळी अंघोळ केल्यावर पिवळे कपडे घाला. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर कामिका एकादशी व्रत आणि विष्णुपूजनाचा संकल्प करून व्रत सुरू करा. 2. या दिवशी ब्रह्मचर्याचे नियम पाळा. फळांच्या आहारावर रहा. वासना, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर इत्यादी चुकीच्या सवयींपासून दूर राहा. सूर्याच्या कृपेनं काहीच कमी नाही पडणार; मिथुन संक्राती या राशींना भरभरून देईल 3. शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा करा. पाटावर किंवा चौरंगावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक करावा. त्यांना पिवळे कपडे, पवित्र धागा, चंदन, फुले, हार इत्यादींनी सजवा. 4. नंतर त्यांची पिवळी फुले, अक्षत, हळद, रोळी, तुळशीची डहाळ, फळे, मिठाई, धूप, दिवा, गंध इत्यादींनी पूजा करावी. या दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहा. त्यानंतर विष्णु चालिसा किंवा विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास 5. कामिका एकादशी व्रत कथा ऐका. त्यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूची आरती करावी. कापूर लावूनही आरती करता येते. पूजेनंतर, क्षमा याचनेसाठी प्रार्थना करा आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद घ्या. 6. दिवसभर श्री हरीचे भजन, कीर्तन इत्यादींमध्ये वेळ घालवा. संध्याकाळी संध्याआरती करावी. मग रात्री जागरण. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानानंतर पूजा करावी. तुमच्या क्षमतेनुसार दान करा. 7. सूर्योदयानंतर शुभ मुहूर्तावर उपवास सोडून व्रत पूर्ण करा. अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत आणि विष्णूची पूजा केल्याने तुमचे कार्य सिद्ध होऊ शकते. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात