जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / उपवास नेमका कधी? दोन दिवस आहे कामदा एकादशी; या गोष्टी, शुभ मुहूर्त लक्षात ठेवा

उपवास नेमका कधी? दोन दिवस आहे कामदा एकादशी; या गोष्टी, शुभ मुहूर्त लक्षात ठेवा

कामदा एकादशीचे महत्त्व

कामदा एकादशीचे महत्त्व

कामदा एकादशीचे व्रत 1 एप्रिल आणि 2 एप्रिल, असे दोन दिवस आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास-पूजा नेमकी कोणत्या दिवशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 मार्च : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी व्रत केलं जातं. यावर्षी कामदा एकादशीचे व्रत 1 एप्रिल आणि 2 एप्रिल, असे दोन दिवस आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास-पूजा नेमकी कोणत्या दिवशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कामदा एकादशीची उपासना व्रत, उपवास केल्यानं कामात यश मिळते, राक्षस योनिपासून मुक्ती मिळते. श्रीहरींच्या कृपेने माणसाची पापे नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून कामदा एकादशीचे व्रत कधी आहे, पूजा मुहूर्त आणि पारण वेळ काय आहे? याविषयी जाणून घेऊ. कामदा एकादशी 2023 पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 01 एप्रिल रोजी पहाटे 01:58 पासून सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी 02 एप्रिल रोजी सकाळी 04.19 वाजता संपत आहे. 2 एप्रिल रोजी हरिवास सकाळी 10.50 पर्यंत आहे, त्यामुळे कामदा एकादशीचे व्रत दोन दिवस आहे. 01 एप्रिल रोजी गृहस्थ कामदा एकादशी व्रत आणि 02 एप्रिल रोजी वैष्णव व्रत पाळतील. कामदा एकादशी पूजेच्या वेळा - कामदा एकादशी व्रताची 01 एप्रिलला पहाटेपासूनच पूजा करता येते, कारण पहाटे 06:12 पासूनच रवियोग तयार होत आहे. हा शुभ योग आहे. दुसऱ्या दिवशी 02 एप्रिल रोजी सकाळी 04:48 वाजता रवि योग आहे. सकाळचा शुभ मुहूर्तही आहे. हा शुभ मुहूर्त सकाळी 07:45 पासून सुरू होत असून सकाळी 09:18 पर्यंत राहील. कामदा एकादशीची पूजा तुम्ही शुभ काळात करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

कामदा एकादशी पारण वेळा - जे 1 एप्रिल रोजी कामदा एकादशीचे व्रत करतात ते 02 एप्रिल रोजी दुपारी उपवास पूर्ण करतील. 02 एप्रिल रोजी कामदा एकादशी पारण वेळ दुपारी 01:40 ते 04:10 पर्यंत आहे. वैष्णव लोक 02 एप्रिल रोजी कामदा एकादशीचे व्रत ठेवतील आणि 03 एप्रिल रोजी सकाळी 06.09 ते 06.24 या वेळेत व्रत पूर्ण करतील. कामदा एकादशीच्या दिवशी भद्रकाळ - कामदा एकादशीच्या दिवशी भद्रकाळाची छाया असणार आहे. मात्र, भद्रकाळापूर्वीच पूजा होईल. 01 एप्रिलला भद्रकाळ दुपारी 03:10 वाजता सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी, 02 एप्रिलला पहाटे 04:19 वाजता समाप्त होईल. हे वाचा -  मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात