मुंबई, 22 मार्च : हिंदू धर्मात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माबरोबरच त्याच्या कुंडलीत अनेक योग येतात. यातील काही योग खूप चांगले असतात, जे त्या व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकतात तर काही योग अत्यंत वाईट असतात. याशिवाय कुंडलीत असे काही योगही तयार होतात, जे राशीला संमिश्र परिणाम देतात. अशा परिस्थितीत, सर्व सुख-सुविधा असूनही व्यक्ती बहुतेक वेळा अस्वस्थच राहते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक प्रकारचे शापित योग आढळतात. कालसर्प योग हा या शापित योगांपैकी एक आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा कालसर्प योगाबद्दल अधिक माहिती देत आहेत.
कालसर्प दोष असल्याचे असे ओळखा -
ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, तेव्हा त्याला विविध प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं. कालसर्प दोषामुळे शारीरिक व आर्थिक अडचणी येतात. काही लोकांना कालसर्प दोषामुळे मुलांशी संबंधित समस्यांनाही सामोरं जावं लागतं. एकतर ती व्यक्ती निपुत्रिक राहते किंवा मूल सतत आजारी असते. कालसर्प दोषामुळे व्यक्तीची नोकरीही पुन्हा पुन्हा सुटते आणि त्याला अनेक वेळा कर्ज घ्यावे लागते. कालसर्प दोष असल्यास विद्वान ज्योतिषाच्या सल्ल्याने त्याचे निवारण करणे आवश्यक आहे.
कालसर्प दोष निवारण -
हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रात कालसर्प दोष दूर करण्याचे अनेक सोपे उपाय सांगितले आहेत. पती-पत्नीमध्ये मतभेद-वाद होत असल्यास, मोराच्या पंखाचा मुकुट घातलेल्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घरात स्थापित करा आणि नियमित तिची पूजा करा. पूजा करताना "ओम नमो भगवते वासुदेवाय नमः" किंवा "ओम नमो वासुदेवाय कृष्णाय नमः शिवाय" या मंत्राचा जप करा. या मंत्रांचा नियमित जप केल्यानं कालसर्प दोष शांत होतो, असे मानले जाते.
नोकरीतील अडचणी दूर करणे -
जर तुम्हाला किंवा कोणत्याही व्यक्तीला कालसर्प दोषामुळे नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर पलाशचे फूल गोमूत्रात बुडवून बारीक वाटून पावडर बनवा आणि चंदनाच्या पावडरमध्ये मिसळून शिवलिंगावर त्रिपुंडाचा आकार तयार करा. 21 दिवस असं केल्यास कालसर्प दोष शांत होईल आणि नोकरीची समस्या लवकर दूर होईल.
हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.