जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / jyeshtha Darsh Amavasya 2023: आज ज्येष्ठ दर्श अमावस्या; सर्वार्थ सिद्धीसह 2 शुभ योगात पूजा-विधींचा मिळेल लाभ

jyeshtha Darsh Amavasya 2023: आज ज्येष्ठ दर्श अमावस्या; सर्वार्थ सिद्धीसह 2 शुभ योगात पूजा-विधींचा मिळेल लाभ

ज्येष्ठ दर्श अमावस्या 2023

ज्येष्ठ दर्श अमावस्या 2023

हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 17 जून रोजी सकाळी 09:11 वाजता सुरू होत आहे. ही तिथी रविवार, 18 जून रोजी सकाळी 10:06 वाजता समाप्त होईल. त्यामुळे ज्येष्ठाची दर्श अमावस्या…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : ज्येष्ठ महिन्याची दर्श अमावस्या आज शनिवार, 17 जून रोजी आहे. यावेळी ज्येष्ठ दर्श अमावस्येला सर्वार्थ सिद्धीसह दोन शुभ योग तयार होत आहेत. दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्राची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. पितरांसाठी केलेले दान पुण्य, सुख आणि शांती देते, असे मानले जाते. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून दर्श अमावस्येची तिथी, तयार होणारा शुभ योग आणि पितरांची पूजा केल्याने होणारे फायदे, याविषयी जाणून घेऊ. आषाढ दर्श अमावस्या दिनांक 2023 हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 17 जून रोजी सकाळी 09:11 वाजता सुरू होत आहे. ही तिथी रविवार, 18 जून रोजी सकाळी 10:06 वाजता समाप्त होईल. त्यामुळे ज्येष्ठाची दर्श अमावस्या 17 जून रोजी आज आहे आणि तारखेनुसार 18 जून रोजी आहे. पण अमावस्येसाठी करण्याचे विधी आज दिवसभरात किंवा रात्री करावेत.

News18लोकमत
News18लोकमत

सर्वार्थ सिद्धीसह 2 शुभ योगांमध्ये दर्श अमावस्या यंदा ज्येष्ठ दर्श अमावस्येच्या दिवशी दोन शुभ योग तयार होत आहेत. पहिला योग सर्वार्थ सिद्धी योग आहे. पहाटे 05:23 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असून तो संध्याकाळी 04:25 पर्यंत राहील. अमृत​सिद्धी योग हा दुसरा योग होत तयार आहे. अमृत-सिद्धी योग देखील सकाळी 05:23 ते 04:25 पर्यंत आहे. हे दोन्ही शुभ योग जवळपास 11 तास राहतील. सर्वार्थ सिद्धी योग शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो. या योगात केलेले कार्य सफल होऊन त्याचे पूर्ण फळ मिळते. दर्श अमावस्येच्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त सकाळी 11.54 ते दुपारी 12.50 पर्यंत आहे. घरात अमावस्येच्या दिवशी या गोष्टी करून घ्या; पितृदोषासह टळतील ही संकटे दर्श अमावस्येला चंद्राची पूजा दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्राची पूजा करून व्रत केल्यास रोगरई दूर होते आणि कामातील अडथळे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच कुंडलीतील चंद्र दोषही दूर होतो. चंद्राची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. दर्श अमावस्येला पितृपूजेचे फायदे 1. दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. यामुळे सकाळी स्नान करून पितरांची पूजा करावी. 2. दर्श अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नानानंतर पाण्याने तर्पण करावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. 3. दर्श अमावस्येच्या निमित्ताने पितरांसाठी दान करणे खूप फायदेशीर आहे. पितृदेव त्यामुळे प्रसन्न होतात. पितृदोषापासून मुक्ती मिळते. 4. दर्श अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी पिंडदान, श्राद्धकर्म, पंचबली कार्य करू शकता. यावर पूर्वज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. कुटुंबात सुख आणि शांती मिळते. संततीमध्ये वृद्धी होते, संततीचे सुख प्राप्त होते. घर धनधान्याने भरलेले राहत. 5. दर्श अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी खीर, पुरी आणि मिठाई दक्षिण दिशेला ठेवा. संध्याकाळी पितरांसाठी दिवा लावावा. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात