जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / सुरतच्या हिरे व्यापाऱ्याच्या नऊ वर्षांच्या मुलीने घेतली दीक्षा! सुखविलास आयुष्य सोडून झाली साध्वी

सुरतच्या हिरे व्यापाऱ्याच्या नऊ वर्षांच्या मुलीने घेतली दीक्षा! सुखविलास आयुष्य सोडून झाली साध्वी

हिरे व्यापाऱ्याच्या मुलीने घेतली दीक्षा!

हिरे व्यापाऱ्याच्या मुलीने घेतली दीक्षा!

गुजरात राज्यातील सुरत शहरातील अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीने सन्यास स्वीकारला आहे.

  • -MIN READ Trending Desk Surat,Gujarat
  • Last Updated :

    सुरत, 18 जानेवारी : जैन हा अतिप्राचीन धर्मांपैकी एक मानला जातो. इसवी सनपूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म आणि संप्रदाय उदयाला आले. जैन धर्म हा त्यापैकीच एक आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जैन हा भारतातला सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. जैन धर्मातल्या अनेक व्यक्ती संन्यास स्वीकारतात. पांढरे कपडे घातलेले जैन मुनी तुम्ही कधी ना कधी बघितलेही असतील; मात्र नऊ वर्षांची मुलगी संन्यासी झाल्याचं कधी ऐकलं आहे का? गुजरातमधल्या सुरत शहरात असं घडलं आहे. शहरातले हिरे व्यापारी मोहनभाई संघवी यांची नात आणि धनेश-अमी बेन यांच्या नऊ वर्षांच्या मुलीने संन्यास घेतला आहे. देवांशी असं या मुलीचं नाव आहे. वेसू इथे 14 जानेवारीपासून देवांशीच्या दीक्षा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज (18 जानेवारी) सकाळी सहा वाजल्यापासून तिला दीक्षा देण्यास सुरुवात झाली आहे. 35 हजारांहून अधिक जणांच्या उपस्थितीत देवांशीला जैनाचार्य कीर्तियसूरीश्वर महाराज यांच्याकडून दीक्षा दिला जात आहे. 4 महिन्यांच्या वयात सोडलं होतं रात्रीचं जेवण देवांशीच्या आई-वडिलांनी सांगितलं की, देवांशी जेव्हा 25 दिवसांची होती तेव्हा तिने नवकारसीचं पाचखान घेण्यास सुरुवात केली होती. ती चार महिन्यांची असल्यापासून तिनं रात्रीचं जेवण सोडलं होते. आठ महिन्यांची असताना तिने दररोज त्रिकाल पूजन सुरू केलं होतं. एक वर्षांची झाल्यानंतर तिनं रोज नवकार मंत्राचा जप सुरू केला. तेरा महिन्यांची झाल्यानंतर तिनं गुरूंकडून धार्मिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. चार वर्षं तीन महिन्यांची असताना तिनं गुरूंसोबत राहण्यास सुरुवात केली. वाचा - लक्ष्मी येई घरा! आपल्या घरातील या 8 गोष्टींमध्ये असतो देवी लक्ष्मीचा वास 8 वर्षांच्या काळात 357 दीक्षा दर्शन आणि 500 किलोमीटरचा पायी प्रवास आठ वर्षांच्या काळात देवांशीने 357 दीक्षा दर्शन घेऊन 500 किलोमीटर पायी चालून तीर्थयात्रा केल्या आहेत. अनेक जैन ग्रंथांचं वाचन करून तिने मूलभूत ज्ञान समजून घेतलं आहे. तिचे आई-वडील सांगितात, की त्यांच्या मुलीने कधीही टीव्ही पाहिला नाही. जैन धर्मात बंदी असलेल्या कोणत्याही गोष्टींचा तिनं वापर केला नाही. कधीही अक्षरं लिहिलेले कपडे घातले नाहीत. देवांशीने केवळ धार्मिक शिक्षणातच नव्हे, तर प्रश्नमंजूषांमध्येही सुवर्णपदक मिळवलेलं आहे. ती भरतनाट्यम, योगासनांमध्येही निपुण आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    संगीत, भरतनाट्यम आणि स्केटिंगमध्ये निपुण आहे देवांशी देवांशीला पाच भाषा येतात. ती संगीत, स्केटिंग, मेंटल मॅथ्स आणि भरतनाट्यम नृत्यामध्ये निपुण आहे. देवांशीने वैराग्य शतक आणि तत्त्वार्थ अध्याय यांसारखे महान जैन ग्रंथ पाठ केले आहेत. सुरतमध्ये देवांशीच्या वर्षीदान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात चार हत्ती, 20 घोडे, 11 उंट होते. याआधी मुंबई आणि अँटवर्पमध्येही तिची वर्षीदान यात्रा झाली होती. देवांशीच्या कुटुंबाला मोठी धार्मिक पार्श्वभूमी आहे. तिच्या कुटुंबातले स्वर्गीय ताराचंद यांना जैन धर्मात विशेष स्थान होतं. त्यांनी श्री सम्मेदशिखरचा भव्य संघ सुरू केला होता. माउंट अबूच्या पायथ्याला त्यांनी संघवी भेरूतारक तीर्थ बांधलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Religion , surat
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात