मुंबई, 20 जून : ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्याची परंपरा प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे. या रथयात्रेतून भगवान जगन्नाथ शहराला भेट देतात, मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा त्यांच्यासोबत ते रथात उपस्थित असतात. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला ही यात्रा सुरू होते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा भव्य आणि विशाल रथात बसून गुंडीचा मंदिरात जातात. हे मंदिर त्यांच्या मावशीचे घरही मानले जाते. ओडिशाच्या या भव्य रथयात्रेत केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही भाविक पुरीत जमतात. या रथयात्रेचे महत्त्व जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून. 2023 सालची रथयात्रा - पंचांगानुसार आषाढ मासातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी 19 जून रोजी सकाळी 11.25 पासून सुरू होत आहे. ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 20 जून 2023 रोजी दुपारी 01:07 वाजता संपेल. आज मंगळवार, 20 जून 2023 रोजी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येणार आहे.
रथयात्रा का काढली जाते? पद्म पुराणानुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने एकदा हे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांची प्रिय बहीण सुभद्रा यांना नगर दाखवण्यासाठी रथात बसवले. यादरम्यान ते गुंडीचा येथे मावशीच्या घरीही गेले आणि येथे सात दिवस राहिले. तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. नारद पुराण आणि ब्रह्म पुराणातही याचा उल्लेख आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देव आपल्या मावशीच्या घरी आपल्या भावंडांसोबत विविध आणि भरपूर पदार्थ खातात, त्यामुळे ते आजारी पडतात. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यानंतरच ते लोकांना दर्शन देतात. घरात अमावस्येच्या दिवशी या गोष्टी करून घ्या; पितृदोषासह टळतील ही संकटे जगन्नाथ रथयात्रा 2023: वेळापत्रक 20 जून 2023 (मंगळवार): जगन्नाथ रथयात्रा सुरू (गुंडीचा मावशीच्या घरी जाण्याची परंपरा) 24 जून 2023 (शनिवार): हेरा पंचमी (पहिले पाच दिवस भगवान गुंडीचा मंदिरात वास्तव्य करतात) 27 जून 2023 (मंगळवार): संध्या दर्शन (या दिवशी जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने 10 वर्षे श्री हरीची पूजा केल्याचे पुण्य मिळते) 28 जून 2023 (बुधवार): बहुदा यात्रा (भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि बहीण सुभद्रा स्वगृही) 29 जून 2023 (गुरुवार): सुनाबेसा (जगन्नाथ मंदिरात परतल्यानंतर भगवान आपल्या भावंडांसोबत शाही रूप धारण करतात) 30 जून 2023 (शुक्रवार): आधर पनं (आषाढ शुक्ल द्वादशीला दिव्य रथाला एक विशेष पेय अर्पण केलं जातं. दूध, पनीर, साखर आणि चीजपासून बनवलेल्या या पेयाला पनं म्हणतात) 1 जुलै 2023 (शनिवार): निलाद्री बीजे (जगन्नाथ रथयात्रेतील सर्वात मनोरंजक विधी म्हणजे निलाद्री बीजे. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचे महत्त्व भगवान जगन्नाथ यांचे सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. पुरी येथे स्थित भगवान जगन्नाथ मंदिर चार धाममध्ये गणले जाते. प्राचीन काळापासून चालत आलेली रथयात्रेची परंपरा आजही पाळली जात आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतात. असे मानले जाते की, जो कोणीही भक्त भगवान जगन्नाथाची खऱ्या मनाने पूजा करतो. त्यांचे सर्व दु:ख दूर होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)