भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 2 जून : प्रत्येक घरात देवालयाला महत्त्वाचं स्थान असतं. सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करायचा, आवरणं झाल्यानंतर पूजा करायची त्यानंतर पुढील कामासाठी घराबाहेर पडायचं असा अनेकांचा रोजचा क्रम असतो. लहान मुलांवरही चांगले संस्कार व्हावे यासाठी त्यांनी दिवेलागणीला शुभमकरोती तसंच पाढे हे देवासमोर म्हणावे, असा बऱ्याच घरात आग्रह असतो. बदलत्या काळानुसार नोकरीची वेळ बदलली आहे. त्यामुळे पुजा करण्याची वेळही कमी झालीय. पण, रोजची पूजा करताना काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. ते कोणते नियम आहेत? त्याचा फायदा काय? याबाबत डोंबिवलीतील ल.कृ. पारेकर गुरूजी यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
देवपूजा कधी करावी? देवाची पूजा करण्यासाठी सकाळचा प्रहर उत्तम असतो. आता बदलत्या काळानुसार तुम्ही कधीही पूजा करू शकता. देवपूजा करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे, असं पारेकर यांनी सांगितलं. देवपूजा करण्याची परंपरा अनादी कालापासून सुरू आहे. ती जपली पाहिजे. सकाळी स्नान केल्यानंतर पूजा करावी, पंचामृत पूजा करावी. आरती करून मंत्रपुष्पांजली म्हणावी. त्यानंतर नैवेद्य दाखवावा. फळ, पंचामृताचा नैवेद्यात समावेश असावा, असं पारेकर यांनी सांगितलं. वर्षातून एकदा तरी कुळधर्म कुलाचार करणे गरजेचे आहे. यामध्ये देखील घरातील परंपरेनुसार कुलदेवतेची ओटी भरणे, यासारख्या गोष्टी कराव्या. त्यानंतर सकाळी फळाचा प्रसाद दाखवून सायंकाळी मात्र गोडाचा स्वयंपाक बनवून हा नैवेद्य देवाला अर्पण करावा. शुक्रवारी कधीही माता लक्ष्मीच्या या एका मंत्राचा करावा जप, मनोकामना होतात पूर्ण या पद्धतीनं पूजा करून नवैद्य दाखवल्यानंतर ते अन्न प्रासादिक होते. यामुळे शरीरातील उर्जा वाढते. मन प्रसन्न होते. सात्विक विचार जागृत होतात असे गुरुजींनी सांगितले. देवपूजा करताना काय साहित्य हवे? देवपूजा करताना फुल, बेलपत्र, दुर्वा हे देवाच्या चरणी अर्पण करावे, त्यानंतर चंदन, हळत-कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का याचा वापर अधिक करावा भूकंप येऊ दे की आणखी काही, राम मंदिराच्या छताला काहीच होणार नाही, कारण… पूजा करताना काय टाळावे? घरात पूजा सुरू असताना वाद विवाद करणे टाळावे. पूजा करणाऱ्या व्यक्तीनं त्यावेळेस घरातील अन्य कोणत्याही गोष्टीकरडं लक्ष देऊ नये. घरातील सर्व सदस्यांनी देवाचं नामस्मरण करावं, या पद्धतीनं पूजा सुफळ संपन्न होते, असं पारेकर गुरूजींनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







