मुंबई: गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सव असावा, असं आवाहन विविध स्तरांतून करण्याय येत आहे. गणपती उत्सवानंतर गावातल्या नद्या, तलाव, विहिरी आणि सगळे पाणवठे एकाच पद्धतीने दिसायचे. पाण्यावर तेलमिश्रित रंगांचा तवंग, तरंगणारं निर्माल्य, अर्धवट विघटन झालेल्या मूर्ती, सजावटीच्या सामानातलं प्लास्टिक, मोती, थर्माकोल. हे असं चित्र त्या गणेशाला तरी पाहावेल का? पर्यावरणाला अशा प्रकारे हानी पोहोचवणारा उत्सव नको म्हणून मूर्ती दान करा पासून ते मुळात पर्यावरणपूरक मूर्तीच बनवा, प्लास्टिक आणि थर्माकोलला स्पष्ट नाही म्हणा असे उपाय आले. त्यापैकी थर्माकोल आणि प्लास्टिकच्या मखरी खरोखर हद्दपार करण्यात आता बऱ्यापैकी यश आलेलं असलं तरी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि चकचकीत मूर्तींचा मोह अजून सुटलेला नाही.
पर्यावरणपूरक मूर्ती म्हणजे काय?
पर्यावरणपूरक गणपती मूर्ती म्हणून मातीच्या गणपतीची ओळख आहे. तर, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ओळखली जाते. आता माती आणि PoP ला पर्या म्हणून हळदीचा, नारळाच्या काथ्या किंवा शेंड्यांचा वापर करून तयार केलेला गणपती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती अगदी एवढंच काय खायच्या पदार्थांपासूनच गणपतीचे आकार तयार करून काही ठिकाणी मूर्ती घडवल्या जातात.
तांदूळाच्या पिठीपासून केलेला गणपती, चॉकलेट गणपती हे त्यातले लोकप्रिय प्रकार. या पद्धतीने केलेली गणपतीची मूर्ती अगदीच पर्यावरणपूरक होते, त्याच्या विसर्जनाचा प्रश्नच येत नाही.
अनेक मंडळं हल्ली अशा प्रकारे इनोव्हेटिव्ह गणेश मूर्ती करताना दिसतात. नारळांपासून केलेला गणपती किंवा कांद्यांचा गणपती यावर्षी सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले आहेत.
View this post on Instagram
मातीची मूर्ती शोधताना या काही टिप्स
प्रत्येक मूर्तीमध्ये विविधतामातीची मूर्ती बनविताना पूर्णपणे साचा वापरला जात नाही. त्यामुळे, धडापासून मूर्तीचे सर्व अवयव दूरदूर दिसतात. मूर्तीवर असलेला उंदीरही चिकटलेला दिसत नाही. पीओपी मूर्ती साचा वापरून तयार करण्यात येत असल्याने उंदीर मूर्तीला पूर्णपणे चिकटलेला दिसेललाकडी पाटाचा वापरमातीची मूर्ती हाताने बनवण्यात येत असल्याने ती बनवताना शक्यतो लाकडी पाटाचा वापर केला जातो.मूर्तीचे वजनपीओपी मूर्ती हलकी आणि मातीची वजनदार असते. हे लपवण्यासाठी मूर्तीच्या तळात वजनदार वस्तू भरल्या जातात. अशा वेळी थोडे कोरल्यास आतील अवजड वस्तू नजरेस पडतील.
निसर्ग रक्षणाचा 'श्रीगणेश', गाईच्या शेणापासून बनवल्या पर्यावरणपूरक मूर्ती, पाहा VIDEO
पूर्ण मातीच दिसल्यास ती मूर्ती शुद्ध मातीची असेल.मूर्तीची चमकपीओपी मूर्ती अधिक चमकदार आणि मातीची कमी चमकदार दिसते. हा फरक निरखून पाहा.मूर्तीच्या मागे छिद्रपीओपी मूर्तीच्या तुलनेत मातीची मूर्ती तयार केल्यानंतर वाळायला वेळ लागतो. तयार केलेली मूर्ती आतमधून योग्य पद्धतीने सुकावी, भेगा पडू नये म्हणून मूर्तीला मागे एक छिद्र ठेवण्यात येते. तर, पीओपी मूर्तीला असे छिद्र पाहायला मिळत नाही.
वाशिममध्ये एका मंडळाने कांद्याचा गणपती केला. त्यासाठी 60 किलो कांदे वापरले. कामरगावच्या जय भवानी गणेश मंडळाची मूर्ती या पर्यावरणपूरक संकल्पनेने भाव खाऊन गेली.
Maharashtra | A Lord Ganesh idol made using 60 kg of onions, established by Jai Bhavani Ganesh Mandal in Kamargaon, Washim pic.twitter.com/WAHhuaUdPl
— ANI (@ANI) September 1, 2022
अशाच प्रकारे कुणी कापसाचा तर कुणी तांदूळाचा गणपती केला. पुण्यात ग्राहक पेठ या डिपार्टमेंटल स्टोअरला दरवर्षी खाद्यपदार्थापासूनच गणपती करतात. बिस्किटांचा, चॉकलेटचा गणपती बाप्पा पाहायला बालगोपाळांची झुंंबड उडते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eco friendly, Ganesh chaturthi