मुंबई, 08 एप्रिल : आपला जन्म कोणत्या दिवशी झाला आणि आपली राशी कोणती आहे, याचा प्रभाव आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर आणि आयुष्यावर दिसून येतो. त्याचप्रमाणे नक्षत्रांचाही आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. तुमचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला, त्याचा तुमच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. येथे आपण रोहिणी नक्षत्राबद्दल बोलू आणि या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व, करिअर, लव्ह लाईफ आणि आयुष्य कसे असते, हे जाणून घेऊ. त्यांच्या सकारात्मक गोष्टी आणि उणिवाही आपल्याला कळतील. रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्यांची वैशिष्ट्ये - रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर ते संगीत आणि फॅशनप्रेमी असतात. पुरुषांबद्दल बोलायचे तर ते आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात. त्यांचे शारीरिक स्वरूप देखील सुंदर, तसेच ते मेहनती आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना व्यवसायात तसेच सर्जनशील क्षेत्रात यश मिळते. दुसरीकडे, आपण रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या महिलांबद्दल बोलायचे झाल्यास त्या सुंदर आणि शालीन असतात. त्यांना योग्य फॅशनची जाण असते आणि ती हुशारही असते. उत्तम गृहिणीचे सर्व गुण या महिलांमध्ये आढळतात. वैवाहिक जीवन - रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफबद्दल बोलायचे तर, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. तथापि, रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या काही लोकांसाठी दोन विवाह होण्याची शक्यता देखील असते. ज्यांचे प्रेमसंबंध आहेत, ते लग्न करण्यात यशस्वी होतात. प्रत्येक सुख-दु:खात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची साथ मिळते. रोहिणी नक्षत्रात जन्मलेले लोक चांगले पालक सिद्ध होतात. सर्जनशील क्षेत्रात तसेच व्यवसायात यश - रोहिणी नक्षत्रात जन्मलेले लोक बुद्धिमान आणि प्रतिभावान असतात. त्यांची सर्जनशील क्षमताही चांगली असते. असे लोक फॅशन, सौंदर्य, संगीत आणि मनोरंजन यासारख्या क्षेत्रांमध्ये कामगिरी चांगली करतात. त्यांना व्यवसायातही यश मिळते.
रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्यांचे आरोग्य - रोहिणी नक्षत्रात जन्मलेले लोक निरोगी आणि आनंदी जीवन जगतात, परंतु त्यांना रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. योगासने आणि व्यायाम करणे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. हे वाचा - घरात या दिशेला स्वस्तिक काढणं शुभ मानलं जातं; आकार नेहमी इतकाच असावा रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्यांच्या सकारात्मक गोष्टी - रोहिणी नक्षत्रात जन्मलेले लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे मालक असतात. ते खूप महत्वाकांक्षी असतात आणि भौतिक सुख मिळवण्याची त्यांची तीव्र इच्छा असते. ते कलाप्रेमी असतात आणि त्यांच्यात नृत्य आणि संगीताची आवडही दिसून येते. ते खरे बोलतात. यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम असते. रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्यांच्या उणिवा - रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्यांची एक कमतरता म्हणजे ते हट्टी असतात. एकदा त्यांनी मत बनवले की, ते सहजासहजी बदलत नाहीत. ते आरामदायी आणि विलासी देखील असतात. अनेकदा एकच काम दीर्घकाळ करत राहतात. रोहिणी नक्षत्राचे लोक सौंदर्याकडे लगेच आकर्षित होतात. अनेकदा त्यांचे मित्रही कमी असतात. जास्त चालाकी करायला जाऊन किंवा अति हुशारीमुळे अनेकवेळा ते स्वतःचे नुकसान करतात. हे वाचा - महादेवाच्या नावावरून बाळाचं नाव ठेवायचंय का? या 6 पैकी एक तुम्हाला पसंत पडेल (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)