मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Holi 2023 : यंदा रंगपंचमीला घरीच बनवा नैसर्गिक रंग, पाहा काय आहे पद्धत? Video

Holi 2023 : यंदा रंगपंचमीला घरीच बनवा नैसर्गिक रंग, पाहा काय आहे पद्धत? Video

X
Holi

Holi 2023 : रासायनिक रंगाचा धोका टाळण्यासाठी घरच्या घरी तुम्ही नैसर्गिक रंग तयार करू शकता.

Holi 2023 : रासायनिक रंगाचा धोका टाळण्यासाठी घरच्या घरी तुम्ही नैसर्गिक रंग तयार करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

    सुशील राऊत,प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर, 3 मार्च :  होळी आणि रंगपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणाच्या निमित्तानं रासायनिक रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचे अनेक दुष्परिणाम देखील होता. हा धोका टाळण्यासाठी घरच्या घरी तुम्ही नैसर्गिक रंग तयार करू शकता. छत्रपती संभाजी नगरमधील विदिशा फाऊंडेशनच्या मनिषा चौधरी यांनी याबाबत काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

    असा तयार करा रंग

    मनिषा चौधरी यांनी पालकापासून हिरवा ओला रंग, बीटपासून लाल, पळसाच्या पानापासून केसरी आणि झेंडूच्या फुलापासून पिवळा रंग कसा तयार करता येतो याची प्रक्रिया समजावून सांगितली आहे. ओला रंग तयार करण्यासाठी तुम्ही संत्री डाळिंबाची साल पालक झेंडूची फुलं गुलाबाची फुलं पळसाची फुलं इत्यादींचा वापर करून तुम्ही ओला रंग तयार करू शकता

    पालकापासून हिरवा रंग बनवण्यासाठी पालकाची पाने तोडून घ्यावी ही पानं तोडून झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. बारीक झाल्यानंतर तुरंग गाळणीने गाळून घ्यावा यापासून हिरवा रंग तयार होतो.

    महाराष्ट्राप्रमाणे झाशीतही होळीच्या दुसऱ्या दिवशी होते रंगांची उधळण, वाचा काय आहे कारण

    बीटपासून रंग तयार करण्यासाठी बीट मिक्सरमध्ये बारीक करावं. त्यानंतर ते गाळून घ्यावं आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकावे त्यापासून लाल रंग तयार करता येतो.

    पळसाची पाने घेतल्यानंतर त्या पानांना रात्री गरम पाण्यामध्ये टाकावं. त्यानंतर त्या पानांचा रंग त्या पाण्यात जातो. त्यापासून केसरी रंग तयार होतो.

    Holi 2023: होळीला जागरणाचे महत्त्व, होलिका दहनाच्या रात्री जप व ध्यानाची परंपरा

    यासोबतच तुम्ही झेंडूच्या वाळलेल्या फुलांपासून देखील रंग तयार करू शकता यासाठी तुम्हाला गरम पाणी घ्यावे लागेल त्यामध्ये झेंडूची फुले टाकायची काही वेळानंतर त्या झेंडूच्या फुलांचा रंग पाण्यात जातो आणि त्यापासून पिवळा रंग तयार होतो.

    कोरोना निर्बंधाच्या दोन वर्षानंतर होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवात रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून  रासायनिक रंगाच्या ऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. यामुळे तुम्हाला कोणतीही इजा होणार नाही तसंच निसर्गाचीही हानी होणार नाही,' असं आवाहन चौधरी यांनी यावेळी केलं.

    First published:
    top videos

      Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Holi 2023, Lifestyle, Local18, Rangpanchami 2023