मुंबई, 27 फेब्रुवारी: चैत्र महिन्यातील प्रतिपदेला होळी सण साजरा केला जातो. होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक होतो. या आठ दिवसांमध्ये ग्रहांची स्थिती बदलत राहते. यासोबतच या काळात शुभ कार्य करणेदेखील निषिद्ध मानले जाते. यावेळी होलाष्टक 27 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून सुरू होत असून ते 07 मार्च रोजी संपेल आणि 08 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल.
होलाष्टक म्हणजे काय?
हिंदू मान्यतेनुसार, होलाष्टकादरम्यान एखाद्या व्यक्तीने कोणतेही शुभ कार्य केले तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर माणसाच्या आयुष्यात कलह, रोगराई आणि अकाली मृत्यूची छायाही घिरट्या घालू लागते. त्यामुळे होलाष्टकचा काळ शुभ मानला जात नाही. वास्तूनुसार वाहनांची जागाही असते महत्त्वाची, वाचा वास्तूनुसार पार्किंगचे खास नियम
होळाष्टक काळात ही कामे करू नका
1. या काळात विवाह, भूमिपूजन, गृह प्रवेश करणे किंवा कोणताही नवीन व्यवसाय उघडणे निषिद्ध मानले जाते. 2. शास्त्रानुसार होलाष्टकाची सुरुवात केल्याने नामकरण, मौजीबंधन, गृहप्रवेश समारंभ, विवाह विधी यांसारखे 16 विधी, शुभ कार्येही वर्जित असतात. 3. कोणत्याही प्रकारचे हवन, यज्ञकर्मदेखील या दिवसात केले जात नाही. 4. याशिवाय नवविवाहित महिलांना या दिवसांमध्ये त्यांच्या मातृगृहात राहण्याचा सल्ला दिला जातो. होलाष्टक काळात ही कामे करा 12 मार्चपर्यंत 3 राशींवर लक्ष्मीची कृपा, शुक्र गोचरमुळे मिळेल अमाप संपत्ती! 1. होलाष्टकात दानासारखे शुभ कार्य होऊ शकते असे मानले जाते. ज्यामुळे सर्व त्रास दूर होतात. 2. यावेळी तुम्ही पूजापाठदेखील करू शकता.
होलाष्टक कधी सुरू होत आहे?
यंदा होलिका दहन 7 मार्च 2023 रोजी होणार आहे. 8 मार्चला धूलिवंदन आहे. होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक पाळले जाते. म्हणूनच या वर्षी होलाष्टक 27 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू होईल आणि 7 मार्चपर्यंत राहील.
होलाष्टकाचे महत्त्व
होलाष्टक हे भक्ती-शक्तीचे प्रतीक मानले जाते. या काळात तपश्चर्या केली तर ते खूप शुभ असते असे म्हणतात. होलाष्टकाला झाडाची फांदी तोडून जमिनीवर लावण्याची प्रथा आहे. त्यानंतर या फांदीवर रंगीबेरंगी कपडे बांधले जातात. ही शाखा प्रल्हादाचे रूप मानली जाते. हे रत्न धारण केल्याने लोकप्रियता आणि आत्मविश्वास वाढतो; काय सांगते रत्नशास्त्र?
होलाष्टकाची कथा
होलाष्टकाच्या दिवशी भगवान महादेवाने कामदेवाचा भस्मसात केले होते, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. कामदेवांनी शिवाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे महादेव क्रोधित झाले. यादरम्यान त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाचा नाश केला होता. मात्र, कामदेवाने चुकीच्या हेतूने शिवाची तपश्चर्या मोडली नाही. कामदेव यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण देवलोक शोकसागरात बुडाला. यानंतर कामदेवाची पत्नी देवी रतीने भगवान भोलेनाथांची प्रार्थना केली आणि आपल्या मृत पतीला परत आणण्याची इच्छा मागितली, त्यानंतर महादेवाने कामदेवाला जिवंत केले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)