जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Solapur News: खरा श्रावण कधी? काय झाला गोंधळ, ऐका पंचागंकर्त्यांकडून VIDEO

Solapur News: खरा श्रावण कधी? काय झाला गोंधळ, ऐका पंचागंकर्त्यांकडून VIDEO

Solapur News: खरा श्रावण कधी? काय झाला गोंधळ, ऐका पंचागंकर्त्यांकडून VIDEP

Solapur News: खरा श्रावण कधी? काय झाला गोंधळ, ऐका पंचागंकर्त्यांकडून VIDEP

अधिक मासामुळे महाराष्ट्रातील जनतेत श्रावण महिन्याबाबत संभ्रम आहे. खुद्द पंचांगकर्ते दाते यांनीच कोणता श्रावण खरा हे सांगितलंय.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

सोलापूर 5 जुलै - भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साधारणपणे चैत्र महिन्यापासून सुरुवात होणाऱ्या हिंदू नववर्षात श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. अनेक विधी आणि कर्म यांची सांगड या महिन्यात घालण्यात येते. परंतु यंदाच्या वर्षी अधिक श्रावण महिना आल्याने नेमकी व्रतवैकल्ये आणि विधिवत पाटपूजा कोणत्या श्रावण महिन्यात कराव्यात? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. याबाबतच सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात व्रतवैकल्यांचा श्रावण मास भारतात प्रत्येक राज्य आणि त्याची संस्कृती आणि परंपरा वेगळ्या आहेत. विशेष म्हणजे मराठी महिन्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्ये केली जातात. परंतु, अधिक श्रावण आल्याने नेमका कोणता श्रावण पवित्र मानायचा? शिवाय श्रावणात कोणते सोमवार हे खरे धरायचे? हा प्रश्न मराठी माणसांना पडला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

उत्तर भारतीय कोणता श्रावण मानतात? सर्व साधारणपणे उत्तर भारतात 3 जुलैची यंदाच्या वर्षीची गुरुपौर्णिमा झाल्यानंतर श्रावण महिना धरायला सुरुवात होते. आपला आषाढ कृष्णा पक्ष असतो. तर त्यांचा श्रावण कृष्ण पक्ष असतो. त्यामुळे 4 जुलैपासून ते श्रावण सुरू करतात आणि याच महिन्यात उत्तर भारतात श्रावणातील शिवपूजा आणि व्रतवैकल्य सुरू होतात. हा महिना झाल्यानंतर मध्ये अधिक महिना येऊन पुन्हा शुक्लपक्ष येतो आणि पुन्हा श्रावण सुरू होतो, असे दाते यांनी सांगितले. यंदाचा श्रावण आहे फार कष्टाचा! ‘या’ राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी महाराष्ट्रात कोणता श्रावण? अधिक महिना आणि श्रावण महिना असे मिळून यंदाच्या वर्षी श्रावण सोमवार करायचे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतु महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र भागांमध्ये असा कोणताही वेगळा श्रावण नसल्याने अधिक श्रावणात कोणतेही व्रत आपण करायचे नाही. मंगळागौरी शिवपूजन आणि वर्तवैकल्य हे महाराष्ट्रातील लोकांनी शुद्ध श्रावण मध्ये येणारे चार सोमवार करायचे आहेत. अधिक श्रावण मास हा 18 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत आहे. तर 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत नेहमीचा श्रावण असल्याने महाराष्ट्रातील मराठी माणसांनी 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हाच श्रावण खरा धरावा आणि याच महिन्यात सर्वच श्रावणातील विधी पूर्ण कराव्यात, असेही दाते यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात