मुंबई, 06 मार्च : अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत नसलो, तरी त्याला पाहताच त्याच्या स्वभावाचा वा व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधतो. हा अंदाज आपण त्या व्यक्तीचा पोषाख, टापटीपपणा, केसांची विशिष्ट रचना याच्या आधारावर बांधतो. केसांच्या आधारावर एखाद्या अनोळखी व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कसं ओळखायचं हे जाणून घेण्याच्या काही नैसर्गिक पद्धती पाहू या. केस विशिष्ट प्रकारे कापण्यासाठी वा आकार देण्यासाठी महिला खूप संवेदनशील असतात. दिवसातला बराच वेळ त्या आपल्या केसांची निगा राखण्यासाठी खर्च करतात. केस कसे ठेवावेत यासाठी त्या खूप विचार करतात; पण तुम्हाला एक माहीत आहे का, की केसांच्या डिझाइनपासून ते केसांच्या प्रकारापर्यंत प्रत्येक गोष्ट तुमच्याबद्दल काही तरी सांगत असते. चला तर जाणून घेऊ या. लांब केस - लांब केसांचे अनेक अर्थ असू शकतात. अनेक महिलांना असं वाटतं, की, लांब केस त्यांना अधिक आकर्षक बनवतात. परंतु अनेकांच्या लांब केसांतून स्वातंत्र्याची गरजदेखील व्यक्त होते. छोटे केस - एखाद्या महिलेचे केस लांबीला छोटे असून, ती केसांची फार चांगल्या पद्धतीने निगा राखत असेल तर ती क्रिएटिव्ह असल्याचं अनुमान आपण बांधू शकतो. ती आपल्या केसांच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करू इच्छित असते. कोणतीही उच्च दर्जाची केशरचना खर्चिक असते. कारण त्यासाठी हेअरस्टायलिस्टकडे वारंवार जावं लागतं.
वेव्ही हेअर - वेव्ही केशरचना ठेवणाऱ्या महिलांकडे एक मजेदार व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिलं जातं. वेव्ही केस असलेल्या महिला स्वप्नाळू व सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या असतात. सरळ, स्लीक केस - सरळ केस असलेल्या महिल्या आपल्या केसांप्रमाणेच गंभीर, व्यावसायिक व साध्या सरळ स्वभावाच्या असतात. असं मानलं जातं, की सरळ केस असणाऱ्या महिला शांत व आकर्षक असतात. तुम्ही पाहिलं असेल, की जिथे गंभीर दिसावं लागतं, अशा प्रोफेशन्समध्ये महिला सरळ केस ठेवतात. हे वाचा - होळीचा सण का साजरा केला जातो? विष्णूभक्त प्रल्हादाशी संबधित अशी आहे पौराणिक कथा कुरळे केस - कुरळे केस असलेल्या व्यक्ती उत्साही असतात. केस कुरळे असल्यास लोक अशा व्यक्तीला बिनधास्त व नेहमी कामासाठी उपलब्ध असणारी व्यक्ती असं समजतात. अशा प्रकारे केसांची ठेवण व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवते. अगोदर याबद्दल माहिती नसलं, तरी हे वाचून आता नक्कीच उपयोग होईल. व्यक्ती अनोळखी असली, तरी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा या माहितीच्या आधारे अंदाज बांधू शकाल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)