जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / होळीचा सण का साजरा केला जातो? विष्णूभक्त प्रल्हादाशी संबधित अशी आहे पौराणिक कथा

होळीचा सण का साजरा केला जातो? विष्णूभक्त प्रल्हादाशी संबधित अशी आहे पौराणिक कथा

होळीची पौराणिक कथा

होळीची पौराणिक कथा

हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. पण, विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला आणि…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 मार्च : हिंदू सणांपैकी अत्यंत महत्वाचा सण म्हणजे होळी. फाल्गुन मासातील पौर्णिमा ही होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी संपूर्ण भारतात होलिका दहन केले जाते. हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली. तितक्यात नरसिंह खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दुष्ट प्रवृत्ती हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले. सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी? तेव्हा महादेवांनी वरदान देवून कामदेवाला जीवनदान दिले. व सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. हा उत्सव पाच दिवस चालला. फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंग पंचमीला या उत्सवाची सांगता झाली. रंग पंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस. या दिवशी सर्व देव रंग खेळतात, असे समजले जाते. चांदीच्या पिचकारीतून केशराचे पाणी शिंपडले जाते. आजही ब्रिजभूमी येथे फार मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. तऱ्हेतऱ्हेचे फुलांचे रंग, गुलाल याने राधा-कृष्ण होळी खेळतात, असा समज आहे. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. हळूहळू ह्या सणाचे रूप बदलून केवळ दोन दिवस हा उत्सव साजरा केला जाऊ लागला. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवसाला धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हटले जाते. सर्व मित्र, नातेवाईक एकत्र येऊन रंग खेळतात. आपापसातील वैरभाव विसरून मिष्टान्न सेवन केले जाते, रंग खेळले जातात.

News18लोकमत
News18लोकमत

मात्र, ह्या सणाला अलिकडे विकृत स्वरूप येऊ लागले आहे, त्यावर नक्कीच उपाय करणे गरजेचे आहे. हा आपला पवित्र सण आहे. या दिवशी कुठल्याही प्रकारची विकृत आणि अर्वाच्य भाषा वापरणे, चिखल, रासायनिक रंग वापरणे हा गुन्हा समजावा. अतिशय आनंदाने, नैसर्गिक रंग, फुले यांचा वापर करून आनंदाची देवाणघेवाण करावी. होळीचा सण उत्साहाने देशभर साजरा करावा. सर्व बांधवांना होळी आणि रंगोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा. यावर्षी होलिका दहन दिनांक 06 मार्च 2023 सोमवार रोजी असून रंगपंचमी 12 मार्च 2023 रोजी आहे. हे वाचा - सोमवारी हुताशनी पौर्णिमा, होळी दहनासाठी शुभ मुहूर्त, धूलीवंदनची माहिती जाणून घ्या

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात