मुंबई, 01 जुलै : दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी गुरुपौर्णिमा सोमवारी, 3 जुलै रोजी आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लोक आपल्या गुरू-शिक्षकांना आदर करतात. धार्मिक मान्यतेनुसार, वेदव्यासजींचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता, म्हणून या दिवसाला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. यंदा गुरुपौर्णिमेला ब्रह्म आणि इंद्र योग तयार होत आहेत. सकाळी 05:27 ते 06:47 पर्यंत भद्रकाळाची छाया आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर 5 सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती करू शकता आणि कुंडलीतील गुरु दोषही शांत होऊ शकतो. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांनी गुरुपौर्णिमेचे ज्योतिषीय उपाय सांगितले आहेत. गुरु पौर्णिमेसाठी ज्योतिषीय उपाय - 1. जीवनात चांगला गुरू नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पति नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही, मग तो व्यवसाय करत असो किंवा नोकरी. अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. विष्णूपूजेत पंचामृत, तुळशी आणि पिवळ्या फुलांचा वापर करा. गूळ, हरभरा डाळ किंवा बेसन लाडू अर्पण करा. विष्णूच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल.
2. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पूजागृहात गुरु यंत्राची स्थापना करून गुरु यंत्राची पूजा करा. त्यानंतर दर गुरुवारी विधिपूर्वक पूजा करावी. यामुळे तुमच्या जीवनात गुरूचा सकारात्मक प्रभाव वाढेल, तुमची प्रगती होईल. कमकुवत बृहस्पति बलवान होईल. Numerology: या जन्मतारखा असलेल्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते जास्त 3. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूकडे जा, त्यांना नमस्कार करा आणि त्यांना घरी जेवायला बोलवा. भोजन, आदरातिथ्य इत्यादी झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घ्या. पिवळे कपडे, धार्मिक पुस्तक भेट म्हणून द्या. दक्षिणा देऊन आनंदाने निरोप घ्यावा. गुरुच्या कृपेने बृहस्पति दोष दूर होईल. नशीब चमकेल. 4. करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्ही गुरुपौर्णिमेला पिवळे कपडे, पिवळी डाळ, केशर, तूप, पितळ, पिवळी मिठाई इत्यादी दान करू शकता. 5. गुरुपौर्णिमेला घराची उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य दिशा स्वच्छ करावी. नंतर त्यावर हळद व पाणी टाकून लेप करावा. त्यानंतर तेथे तुपाचा दिवा लावावा. ईशान्य कोन देव गुरु बृहस्पतिशी संबंधित आहे. या उपायाने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. गुरु पौर्णिमा तारीख - गुरु पौर्णिमा तिथीची सुरुवात: 02 जुलै, रविवार, रात्री 08.21 पासून गुरु पौर्णिमा समाप्ती तारीख: 03 जुलै, सोमवार, 05.08 वाजता शुभ मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्त: सकाळी 11:57 ते दुपारी 12:53 Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)