जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vastu tips: घराच्या चौकटीला बांधा या झाडाचं मूळ; वास्तूदोष दूर होतात, कुटुंबात राहते सुख-शांती

Vastu tips: घराच्या चौकटीला बांधा या झाडाचं मूळ; वास्तूदोष दूर होतात, कुटुंबात राहते सुख-शांती

प्रवेशद्वाराचे वास्तु नियम

प्रवेशद्वाराचे वास्तु नियम

Tulsi Vastu Tips: हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे. ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला तुळशीचे मूळ बांधण्याचे महत्त्व जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै : हिंदू धर्म मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात तुळशीचे रोप लावले जाते. तुळशीमध्ये केवळ औषधी गुणधर्मच आढळत नाहीत, तर अनेक प्रकारच्या समस्यांपासून ज्योतिषीय उपायांनी त्रास कमी होऊ शकतात. आत्तापर्यंत आपण तुळशीचे रोप आणि तुळशीच्या पानांच्या माध्यमातून केले जाणारे ज्योतिषीय उपाय ऐकले असतील. पण आजच्या लेखात आपण तुळशीच्या मुळाशी संबंधित ज्योतिषीय उपायांबद्दल सांगणार आहोत. दररोज तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो, असे मानले जाते. घराच्या अंगणात/ बाल्कनीमध्ये तुळस लावल्यानं सकारात्मक ऊर्जा पसरते. यामुळे घरात सुख-शांती राहते. तुळशीच्या पूजेमुळे घरात कलह निर्माण होत नाहीत, असे मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे. ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला तुळशीचे मूळ बांधण्याचे महत्त्व जाणून घेऊ.

News18लोकमत
News18लोकमत

1. सुख-समृद्धीसाठी : वास्तूनुसार घराच्या मुख्य दारावर किंवा चौकटीला तुळशीचे मूळ लटकवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनाची प्राप्ती होते. या उपायाने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास 2. वास्तू दोष दूर होतात : मुख्य दारात चौकटीला तुळशीचे मूळ लटकवल्यानं घरातील वास्तुदोष दूर होतात. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. या उपायाने कुटुंबातील लोकांच्या जीवनात आनंद येतो. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास मुख्य दारावर तुळशीचे रोप देखील ठेवू शकता. हे देखील खूप शुभ मानले जाते. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात