जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / येशू ख्रिस्त कोण होते? येशू ख्रिस्तांचा जन्म कधी, कुठे झाला? त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी

येशू ख्रिस्त कोण होते? येशू ख्रिस्तांचा जन्म कधी, कुठे झाला? त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी

येशु ख्रिस्त कोण होते

येशु ख्रिस्त कोण होते

येशू ख्रिस्तांना ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जाते. आपण देव आहोत, असे त्यांनी कधीच म्हटले नाही, तर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवसेवेसाठी घालवले. आज आपण जाणून घेणार आहोत, येशू ख्रिस्त कोण होते, त्यांचा जन्म कधी आणि कुठे झाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 एप्रिल : ख्रिश्चन धर्माचा मुख्य सण म्हणजे गुड फ्रायडे, आज 7 एप्रिल 2023 रोजी साजरा केला जात आहे. हा दिवस ब्लॅक फ्रायडे, होली फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो. प्रचलित मान्यतांनुसार, प्रभू येशूचा या दिवशी शारिरीक छळ केल्यानंतर वधस्तंभावर लटकवण्यात आले होते. ख्रिश्चन धर्माचे अनुयायी हा दिवस प्रभु येशूचा बलिदान दिवस म्हणून स्मरण करतात. येशू ख्रिस्तांना ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जाते. आपण देव आहोत, असे त्यांनी कधीच म्हटले नाही, तर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवसेवेसाठी घालवले. आज आपण जाणून घेणार आहोत, येशू ख्रिस्त कोण होते, त्यांचा जन्म कधी आणि कुठे झाला. प्रभु येशूचा जन्म - प्रभु येशूचा जन्म पॅलेस्टाईनमधील बेथलेहेम शहरात इ.स.पूर्व 400 ते 500 दरम्यान झाला, असे मानले जाते. त्याचे आई आणि वडील नाझरेथहून आले आणि बेथलेहेममध्ये स्थायिक झाले आणि येथेच प्रभु येशूचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव मरियम आणि वडिलांचे नाव युसूफ होते. त्यांचे वडील युसूफ हे व्यवसायाने शेतकरी होते. धार्मिक मान्यतांनुसार, ईश्वराच्या संकेतानेच युसूफ यांनी मेरीशी लग्न केले होते. येशूच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्यांचे वडील मरण पावले आणि त्यांचे पालनपोषण त्यांची आई मेरीने केले. प्रभु येशूच्या 13 ते 30 वर्षांच्या जीवनाविषयी ख्रिश्चन धार्मिक ग्रंथांमध्ये फारशी माहिती उपलब्ध नाही. यानंतर, वयाच्या 30 व्या वर्षी, प्रभु येशू जॉनकडून शिकले, यानंतर ते धर्माच्या स्थापनेत गुंतले. प्रभू येशूबद्दल लोकांच्या हृदयात वाढत चाललेले प्रेम पाहून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्मांधांनी त्यांचा कडाडून विरोध केला. त्यामुळे ज्यू राजा पोन्टियन्सने प्रभु येशूला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. पण, यामुळे ते विचलित न होता धर्माचा प्रचार करत राहिले. राजा पॉन्टियन्सला भीती वाटली की, जर त्याने प्रभु येशूला थांबवले नाही तर ज्यू कदाचित क्रांती करू शकतात. यासाठी प्रभु येशूला मृत्यूदंड देण्यात आला होता.

News18लोकमत
News18लोकमत

प्रभू येशूला शिक्षा म्हणून वधस्तंभावर खिळवण्यात आले, तो दिवस शुक्रवार होता. जेव्हा ते मृत्युमुखी पडले तेव्हा त्यांना थडग्यात पुरण्यात आले. 3 दिवसांनंतर प्रभु येशूचे कबरीतून पुनरुत्थान झाले, तो दिवस रविवार होता. ज्याला इस्टर संडे म्हणूनही ओळखले जाते. अनेक यहुद्यांनी हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. यानंतर, प्रभू येशूच्या शिष्यांनी त्यांचा उपदेश लोकांपर्यंत नेला. त्या वेळी एक नवीन धर्म स्थापन झाला, ज्याला ख्रिस्ती म्हणतात. हे वाचा -  आज गुड फ्रायडे, येशू ख्रिस्तांचे 5 प्रेरणादायी विचार तुमच्यासाठी नेहमी प्रेरणा ठरतील (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात