1. ते म्हणत असे की, आपण पवित्र लोकांसाठी आलेलो नाही, तर आपण पापींच्या पश्चात्तापासाठी आलो आहोत. माझे वडील ज्याप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात, त्याचप्रमाणे मी देखील तुमच्या सर्वांवर प्रेम करतो. (फोटो: पिक्साबे)
2. स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी दुसऱ्याच्या जीवाचे रक्षण केले पाहिजे. गरीब लोकांची सेवा केली पाहिजे. इतरांनी तुमच्याशी जसे वागावे, असे तुम्हाला वाटते तसे इतरांशी तुम्ही वागा. (फोटो: पिक्साबे)
3. प्रत्येकांनी एकमेकांवर प्रेम करावे. चोरी, हिंसा, लोभ, व्यभिचार यांसारख्या वाईट सवयी सोडून द्या. देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाप्रमाणे माणसाने जीवन जगले पाहिजे. (फोटो: पिक्साबे)
4. तुम्ही तुमच्या शत्रूंवरही प्रेम करा. जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठीही देवाकडे प्रार्थना करा. यामुळे तुम्ही देवाचे पुत्र व्हाल, जे स्वर्गात असतात. (फोटो: पिक्साबे)
5. तुमची संपत्ती गरिबांना दान करा, तुम्हाला स्वर्गाचा खजिना मिळेल. तुम्ही चांगले जीवन जगाल. एकवेळ उंट सुईच्या नाकातून जाईल पण, श्रीमंत माणूस स्वर्गात जाणे अवघड, असेही ते म्हणायचे. (फोटो: पिक्साबे)