मुंबई, 03 डिसेंबर : हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व आहे. दरमहा दोन एकदाशी पडतात. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकदाशीला मोक्षदा एकदाशी म्हणून ओळखले जाते. यावर्षी, मोक्षदा एकदाशीचा उपवास आज 03 डिसेंबर 2022 रोजी आहे. मोक्षदा एकादशीला गीता जयंतीही साजरी केली जात आहे. गीता जयंतीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मोक्षदा एकदशीचा उपवास केल्यानं पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. मोक्षदा एकदाशी आणि गीता जयंती यांच्यात काय संबंध आहे आणि त्यांचे महत्त्व काय आहे त्याविषयी जाणून घेऊ.
मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती
पंडित इंद्रमणी घनस्याल सांगतात की, मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती यांच्यातील संबंध पौराणिक कथेत सापडतो. असे मानले जाते की ज्या दिवशी भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला, त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी होती. म्हणूनच, गीता जयंती या दिवशी साजरी केली जाते.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीतेची खास उपासना केली जाते. असे मानले जाते की जेव्हा अर्जुन आपल्या प्रियजनांना रणांगणात पाहून विचलित झाले, तेव्हा श्री कृष्णाने गीतेचा उपदेश केला आणि संपूर्ण ताकदीने युद्ध लढायला सांगितले. गीतेच्या उपदेशानंतरच कौरवांना पराभूत करून अर्जुन युद्धभूमीत विजय मिळवू शकला.
गीता-मोक्षदा एकादशीची पूजा
पंडित जी म्हणतात की, गीता एखाद्या व्यक्तीच्या मनाचे विचार शुद्ध करते. योग्य चुकीचा फरक गीतेमधून समजला जातो. मोक्षदा एकादशीला गीतेची उपासना करण्याची परंपरा आहे. यासह भगवान विष्णू आणि श्री कृष्णाचीही उपासना केली जाते.
या दिवशी गीता वाचणे खूप फलदायी आहे. या दिवशी, सकाळी लवकर उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, उपवास करण्याचा संकल्प करावा. उपासनेच्या वेळी भगवान कृष्णाला धूप, दीप, गंध, पुष्प आदि अर्पित करा. त्यामुळे श्री कृष्णाची कृपा आपल्यावर राहते.
वाचा - 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.