मुंबई, 27 जुलै : आपल्याकडे महिना, तिथी, मुहूर्त, वार आदी गोष्टींना विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला येणारी पौर्णिमा (Purnima) आणि अमावास्या (Amavasya) यादेखील धर्मशास्त्रानुसार विशेष मानल्या जातात. आपल्या देशात विविध धर्मांचे (Religion) नागरिक राहतात. धर्मानुसार सण साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या प्रथा, रुढी-परंपरा आदी गोष्टीही वेगळ्या आहेत. आपल्या राज्यातही परंपरा, चालीरीती, सणवार यांमध्ये वैविध्य दिसतं. आषाढ अमावास्या अर्थात गटारी अमावास्येची (Gatari Amavasya) प्रथा बऱ्याच काळापासून पाळली जाते. गटारी अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिना (Shravan) सुरू होतो. हा महिना व्रतवैकल्यं, पूजा-विधी आदी गोष्टींसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे श्रावण महिन्यात बहुतांश मराठी नागरिक मांसाहार (Nonveg) आणि मद्यपान (Drinking) करत नाहीत. त्यामुळे त्या दिवशी यो दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. `हर जिंदगी डॉट कॉम`ने या अमवास्याचं महत्त्व काय आहे, याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कधी आहे अमावस्या? भारतातल्या विविध भागांमध्ये रूढी-परंपरा, चालीरिती वेगवेगळ्या आहेत. सध्या उत्तर भारतात (North India) श्रावण महिना सुरू आहे; मात्र देशातल्या काही राज्यांमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात उत्तर भारताच्या तुलनेत 15 दिवस उशिरा होते. पश्चिम भारतातल्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये दक्षिण भारतीय पंचांगानुसार श्रावण महिना शुक्रवारपासून (29 जुलै 2022) सुरू होत आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी (म्हणजे यंदा 28 जुलै 2022 रोजी) ही अमावास्या आहे. Vastu Tips : तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे हे कसे ओळखाल? हे आहेत काही संकेत काय आहे महत्त्व? पश्चिम भारतात या तिथीला विशेष महत्त्व आहे. गटारी अमावास्येनंतर किमान 40 दिवस मराठी माणसं मांसाहार आणि मद्यपान करत नाहीत; मात्र गटारी अमावास्येच्या दिवशी अनेक जण मांसहार आणि मद्यपान मोठ्या प्रमाणावर करतात. यामागे काही कारणं आहेत. ज्योतिषाचार्य आणि वास्तू तज्ज्ञ डॉ. आरती दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, `यंदा 28 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रात गटारी अमावास्या आहे. या दिवशी बहुतांश मराठी नागरिक एकत्र भोजनाचा आस्वाद घेतात. गटारी अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होतो. उत्तर भारतात हा महिना 15 दिवस अगोदर सुरू होतो. आषाढ अमावास्येला उत्तर भारतात हरियाली अमावास्या (Hariyali Amavasya) असं म्हणतात. उत्तर भारतात या दिवशी पितरांसाठी तर्पण करण्याची प्रथा आहे.’ Traditions : सोन्याचे जोडवे घालण्याची चूक पडू शकते महागात, पती पत्नी दोघांनाही होईल त्रास मराठी माणसं गटारी अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी करतात. गटारी अमावास्येनंतर मांसाहार आणि मद्यपान काही दिवसांसाठी वर्ज्य केलं जातं. त्यामुळे गटारी अमावास्येच्या दिवशी कुटुंबातले सदस्य, मित्रमंडळी एकत्र येऊन भोजन करतात. श्रावण महिना सुरू होताच मराठी माणसं भगवान शंकराची सेवा सुरू करतात. श्रावण महिना सुरु झाल्यापासून पुढील 40 दिवस सात्त्विक भोजन करण्याचा संकल्प सोडतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







